आयसीसी वनडे विश्वचषक 2023 साठी मंगळवारी (5 सप्टेंबर) भारतीय संघाची घोषणा केली गेली. या संघात शिखर धवन, युझवेंद्र चहल, संजू सॅमसन आणि भुवनेश्वर कुमार अशा काही महत्वाच्या खेळाडूंनी निवडले गेले नाही. याच पार्श्वभूमीवर कर्णधार रोहित शर्मा याने पत्रकार परिषदेत संघात निवड न झालेल्या खेळाडूंसाठी खास संदेश दिली.
विश्वचषक 2023 साठी फिरकीपटू रविचंद्रन अश्विन याचेही नाव चर्चेत होते. त्याचसोबत युवा फलंदाज तिलक वर्मा आणि वेगवान गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा यांनाही विश्वचषक संघात जागा बनवता आली नाहीये. दरम्यान, आगामी विश्वचषकात भारताचा कर्णधार म्हणून खेळणारा रोहित शर्मा (Rohit Sharma) याला देखील 2011 साली अशाच प्रकारे विश्वचषक संघात स्थान मिळाले नव्हते. अशात ज्या खेळाडूंना आगामी विश्वचषकात संधी मिळाली नाही, त्यांच्यासाठी रोहितने आपला वैयक्तिक अनुभव शेअर केला आहे.
भारतीय संघाचे मुख्य निवडकर्ते अजित आगरकर आणि कर्णधार रोहित शर्मा यांनी पत्रकार परिषद घेऊन भारतीय संघाची घोषणा केली. 15 सदस्यीय संघ घोषित केल्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, “संघ निवडल्यानंतर काहीजण नाराज होतील. पण जे आहे ते आहे. मी देखील अशा परिस्थितीतून गेलो आहे. अशा परिस्तितीत मान ताठ ठेवा आणि पुढच्या संधीची वाट पाहा, एवढेच आपल्या हातात आहे.” (Rohit’s emotional message for the players who did not get a chance in the World Cup; Said, ‘Me too…’)
विश्वचषकासाठी निवडलेला भारतीय संघ –
रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), विराट कोहली, शुभमन गिल, केएल राहुल (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव , रवींद्र जडेजा, अक्षर पटेल.
महत्वाच्या बातम्या –
आशिया चषकातील भारत-पाकिस्तान सामन्यासह सुपर-4 सामने होणार शिफ्ट? मोठी बातमी आली समोर
Asia Cup 2023 । बांगलादेश संघात स्टार फलंदाजाचे कमबॅक, सुपर फोरमध्ये संघाला देणार ताकद