पुणे: पूना क्लब तर्फे आयोजित तिसऱ्या पूना क्लब फुटबॉल लीग स्पर्धेत रोनाल्डो नट्स, शुगर केन,रॉनी ट्यून्स, विझार्ड ऑफ ओझील व विझार्ड ऑफ ओझील या संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली.
पूना क्लब फुटबॉल मौदानावर सुरू असलेल्या या स्पर्धेत कृष्णा जैनच्या दोन दोलांच्या बळावर रोनाल्डो नट्स संघाने आऊट ऑन बेल संघाचा 3-2 असा पराभव करत स्पर्धेत आगेकुच केली. वैभव पवारच्या दोन गोलांसह शुगर केन संघाने ड्युक्स ऑफ हजार्ड संघाचा 2-1 असा पराभव केला.
अखलाक पुनावालाच्या हॅट्रीक कामगिरीच्या जोरावर विझार्ड ऑफ ओझील संघाने कोक इन कॅन संघाचा 4-3 असा पराभव केला.
अन्य लढतीत रॉनी ट्यून्स संघाने ऍबसुलेटली फॅब्रिगेस संघाचा तर विझार्ड ऑफ ओझील संघाने मार्क ओ पिर्लो संघाचा 3-0 असा पराभव करत आगेकुच केली.
स्पर्धेचा सविस्तर निकाल- साखळी फेरी
रोनाल्डो नट्स -3(कृष्णा जैन 5,11मी, अप्पु(स्वयंगोल14मी)) वि.वि आऊट ऑन बेल- 2(अक्षय चोपडा 7मी, अमित पोकरनाल 9मी)
शुगर केन -2(वैभव पवार 9,11मी) वि.वि ड्युक्स ऑफ हजार्ड- 1(निर्भय मिश्रा 6मी)
रॉनी ट्यून्स – 3(आझान कोनोली 4मी, रोहित जोधव 8,12 मी) वि.वि ऍबसुलेटली फॅब्रिगेस- 0
विझार्ड ऑफ ओझील – 3(तुषार अस्वानी 3,11मी, रजित परदेशी 7मी) वि.वि मार्क ओ पिर्लो- 0
विझार्ड ऑफ ओझील – 4(अखलाक पुनावाला 3,7,12मी, गुनिष बोदी 9मी) वि.वि कोक इन कॅन- 3(यश लुंबा 1,4मी, अनिष केरींग 15मी)