आशिया कप 2022 च्या दुसऱ्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 5 गडी राखून पराभव केला. विराट कोहलीने 35 आणि हार्दिक पांड्याने 33 धावा केल्या. हा सामना कोहलीसाठी खूप खास होता. हा त्याचा 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामना होता. न्यूझीलंडचा माजी क्रिकेटपटू रॉस टेलरने कोहलीचे अभिनंदन आणि अभिनंदन केले आहे. त्यांनी ट्विटरवर आनंद व्यक्त केला.
रॉस टेलरने ट्विटरच्या माध्यमातून कोहलीचे अभिनंदन केले. त्याने लिहिले, “विराट कोहली, भारतासाठी 100 वा टी-20 आंतरराष्ट्रीय सामना खेळल्याबद्दल तुझे अभिनंदन. खास यादीत स्वागत आहे. मला तुला पुढील वर्षांत आणखी सामन्यांमध्ये खेळताना पाहायचे आहे.” अशा आशयाचं एक खास ट्वीट शेअर करत रॉस टेलरने कोहलीचे अभिनंदन आणि स्वागत केले.
Congratulations @imVkohli on your 100th T20 game for India. Welcome to the club. I look forward to watching many more of your games in the years to come!
— Ross Taylor (@RossLTaylor) August 29, 2022
विशेष म्हणजे प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने सर्वबाद 147 धावा केल्या होत्या. यादरम्यान रिजवानने संघासाठी 43 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने ५ विकेट्स गमावून सामना जिंकला. कोहलीने 34 चेंडूत 3 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 35 धावा केल्या. पंड्याने अवघ्या 17 चेंडूत नाबाद 33 धावा केल्या. त्याच्या खेळीत 4 चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता.
दरम्यान, भारतासाठी 100 टी-20 सामना खेळल्यानंतर विराट कोहली 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा रोहित शर्मानंतर केवळ दुसरा खेळाडू ठरला आहे. याशिवाय क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 100 पेक्षा अधिक सामने खेळणारा विराट कोहली हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने आजवर भारतासाठी 100 टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांसह 102 कसोटी आणि 262 वनडे सामने खेळले आहेत. यात त्याने एकूण 70 आंतरराष्ट्रीय शतके देखील झळकावली आहेत.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
तयार रहा! रविवारी पुन्हा एकदा रंगणार भारत-पाक थरार? अशी आहेत समीकरणे
भारताविरुद्धचा पराभव माजी पाकिस्तानी दिग्गजाच्या जिव्हारी; म्हणाला, ‘आझमला कॅप्टन का बनवलंय’
तेरा भाई संभाल लेगा..! दबावाच्या क्षणीही दाखवला आत्मविश्वास, हार्दिकचा स्वॅग पाहून चाहते घायाळ