---Advertisement---

नाद करा पण आमचा कुठं! रॉस टेलरने पठाणला चोप चोप चोपलं, एकाच षटकात ठोकल्या ‘एवढ्या’ धावा

On: गुरूवार, ऑक्टोबर 6, 2022 12:12 AM
Ross-Taylor
---Advertisement---

लिजेंड्स लीग क्रिकेट स्पर्धेचा शेवटचा सामना इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्स संघात पार पडला. बुधवारी (दि. 5 ऑक्टोबर) जयपूरमध्ये पार पडलेल्या या सामन्यात कॅपिटल्सचा 104 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात कॅपिटल्स संघाचा धडाकेबाज फलंदाज रॉस टेलर याने षटकारांचा नुसता पाऊस पाडला. भिलवाडा संघाचा गोलंदाज युसूफ पठाण टेलरच्या विस्फोटक बॅटिंगचा शिकार झाला. अष्टपैलू युसूफ जेव्हा गोलंदाजीला आला होता, तेव्हा कॅपिटल्सच्या 8 षटकात 4 विकेट्स गमावत 44 धावा होत्या. मात्र, टेलरने अवघ्या एका षटकात 30 धावा चोपत सामना पुन्हा रुळावर आणला.

इंडिया कॅपिटल्स आणि भिलवाडा किंग्स (India Capitals vs Bhilwara Kings) संघातील या सामन्यात भिलवाडाचा कर्णधार इरफान पठाण (Irfan Pathan) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. त्याचा हा निर्णय कॅपिटल्सच्या फलंदाजांनी चुकीचा ठरवला. सुरुवातीला कॅपिटल्स संघाने 21 धावांवर 4 विकेट्स गमावल्या होत्या. मात्र, यानंतर रॉस टेलर (Ross Taylor) आणि मिचेल जॉनसन (Mitchell Johnson) यांनी डाव सांभाळला.

https://twitter.com/mufaddal_vohra/status/1577685115802906625

न्यूझीलंडचा टेलर आणि ऑस्ट्रेलियाचा जॉनसन या दोघांनी संघाची धावसंख्या 44 धावापर्यंत नेली. त्यानंतर युसूफ पठाण 9वे षटक टाकण्यासाठी आला. त्याचे हे षटक इंडिया कॅपिटल्स संघासाठी खूपच फायदेशीर ठरले. टेलरने या षटकात एकही चेंडू निर्धाव सोडला नाही. त्याने या षटकात सटासट 30 धावा चोपल्या. टेलरने युसूफच्या षटकात पहिल्या 3 चेंडूत सलग 3 षटकार खेचले. यानंतर चौथ्या चेंडूवर त्याने 2 धावा घेतल्या. टेलर इथेच थांबला नाही, तर त्याने पाचव्या चेंडूवर चौकार मारला आणि सहाव्या चेंडूवर पुन्हा षटकार खेचला.

https://twitter.com/llct20/status/1577671604846227456

ट्रेलरच्या या फटकेबाजीमुळे जो संघ 4 विकेट्स गमावत 44 धावांवर दबावात खेळत होता, तो एकाच षटकानंतर पूर्ण फॉर्ममध्ये आला. 9व्या षटकानंतर कॅपिटल्स संघाची धावसंख्या ४ विकेट्स गमावत 74 धावा इतकी झाली. युसूफ पठाणच्या एका षटकात टेलरने जी फटकेबाजी सुरू केली, त्यानंतर त्याने एकाही गोलंदाजाला सुट्टीच दिली नाही. टेलरची फटकेबाजी 17व्या षटकापर्यंत येऊन थांबली. तो  राहुल शर्माच्या गोलंदाजीवर युसूफ पठाणच्या हातून झेलबाद झाला. मात्र, तोपर्यंत टेलरने 41 चेंडूत 82 धावा चोपल्या होत्या. या धावा करताना त्याने 4 चौकार आणि 8 षटकार भिरकावले होते.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शिखर धवनच्या डोक्यात काय शिजतंय? वनडे मालिकेपूर्वी आपल्या लक्ष्याबद्दल केला खुलासा; म्हणाला…
विराटने दाखवली किशोरदांच्या बंगल्यात बनवलेल्या रेस्टॉरंटची झलक, व्हिडिओ पाहिला का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---