भारत आणि न्यूझीलंड यांच्या दरम्यान एजबॅस्टन येथे जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळला जात आहे. नियोजित तारखेला म्हणजेच १८ जून रोजी एकही चेंडूचा खेळ न झाल्याने सामना शनिवारी (१९ जून) सुरु झाला. मात्र, त्याचवेळी न्यूझीलंडचा अनुभवी फलंदाज रॉस टेलर याने एका मुलाखतीत आपण नॅथन लायनवर जळतो आणि त्यासाठी भारतीय संघ कारणीभूत असल्याचे म्हटले.
या कारणाने लायनवर जळतो टेलर
न्यूझीलंड क्रिकेट संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू असलेल्या रॉस टेलरने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यापूर्वी एक मुलाखत दिली. यामध्ये आपण ऑस्ट्रेलियाचा प्रमुख फिरकीपटू नॅथन लायनवर जळतो असे म्हटले. तसेच यासाठी भारतीय संघ कारणीभूत असल्याचे देखील त्याने सांगितले.
टेलर म्हणाला, “मी माझा १०० वा कसोटी सामना भारताविरुद्ध खेळलो होतो. मात्र, मला भारतीय खेळाडूंनी त्यांची स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली नव्हती. ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने नॅथन लायनला जेव्हा स्वाक्षरी असलेली जर्सी भेट दिली, तेव्हा मी तो सामना पाहत होतो. त्यावेळी माझी प्रतिक्रिया ‘चला राहू दे ठीक आहे’ अशी होती. त्या जर्सीसाठी मी लायनवर जळतो.”
भारतीय संघाने लायनला दिलेली जर्सी
भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेला असता ब्रिस्बेन येथील मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या कसोटीत भारतीय संघाने विजय मिळवत मालिका आपल्या नावे केली होती. त्या कसोटीच्या शेवटी भारतीय कर्णधार अजिंक्य रहाणे याने भारतीय संघातील सर्व सदस्यांची स्वाक्षरी असलेली जर्सी आपला शंभरावा कसोटी सामना खेळणाऱ्या नॅथन लायनला भेट दिली होती.
भारतीय संघ २०२० च्या सुरुवातीला न्यूझीलंड दौऱ्यावर गेला असताना रॉस टेलरने देखील आपला शंभरावा कसोटी सामना खेळला होता. टेलर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०० कसोटी, १०० वनडे व १०० टी२० सामने खेळणारा एकमेव खेळाडू आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
तीन महिन्यांपुर्वीच जेमिसनने आखली होती विराटविरुद्ध रणनीती, आज केला असा ‘गेम’