---Advertisement---

भर सामन्यात कर्णधार विलियम्सनने सहकाऱ्यावर वटारले होते डोळे, स्वत: दिग्गजाने सांगितला किस्सा

On: गुरूवार, जुलै 1, 2021 11:59 AM
---Advertisement---

आयसीसीद्वारे आयोजित जागतिक कसोटी अजिंक्यपद अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड या तुल्यबळ संघात झाला होता. साउथम्पटन येथे पार पडलेला हा ऐतिहासिक सामना न्यूझीलंडने ८ विकेट्सने खिशात घातला. राखीव दिवशी कर्णधार केन विलियम्सन आणि अनुभवी फलंदाज रॉस टेलर यांनी दमदार भागिदारी करत भारताचे १३९ धावांचे लक्ष्य सहज पार केले आणि संघाला पहिलेवहिले कसोटी जेतेपद जिंकून दिले. नुकतेच ३७ वर्षीय टेलरने या सामन्यातील आपला अनुभव सांगितला आहे.

विलियम्सनने टेलरवर का डोळे वटारले?
एका व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत बोलताना टेलरने सामन्यातील अंतिम क्षण आपल्यासाठी अविस्मरणीय असल्याचे सांगितले. तो म्हणाला की, ऐतिहासिक कसोटीत विजयी धाव घेतल्यानंतर विलियम्सनकडे जाणे आणि त्याच्यासोबत सामन्यांतील काही क्षणांची चर्चा करणे, या अशा गोष्टी आहेत, ज्या मी उभ्या आयुष्यात विसरु शकणार नाही.

जेव्हा मी फलंदाजीसाठी मैदानावर उतरलो होतो तेव्हा सामना अतिशय अटीतटीच्या स्थितीत होता. तरीही त्या कठीण परिस्थितीत आम्ही दमदार फलंदाजी केली. यावेळी विलियम्सन आमच्या संघासाठी एक शानदार कर्णधार आणि क्रिकेटच्या दूताप्रमाणे खेळला. तो सामन्याखेर माझ्यासोबत मैदानावर उपस्थित होता. शेवटची विजयी धाव घेण्यापुर्वी त्याने डोळे वटारुन माझ्याकडे पाहिले आणि मला म्हणाला पटकन धावा घे आणि सामना संपव. नाहीतर मला पुन्हा स्ट्राईकवर येऊन खेळावे लागेल. त्याने मला असे म्हणताच मी चौकार मारला आणि विजयाचा जल्लोष साजरा केला, हे सर्व खूप शानदार होते, असेही टेलर पुढे म्हणाला.

विलियम्सन-टेलरच्या भागिदारीने न्यूझीलंडला विजय
भारत-न्यूझीलंड कसोटीच्या शेवटच्या डावात न्यूझीलंडला विजयासाठी १३९ धावांची आवश्यकता होती. यावेळी भारताचा फिरकीपटू आर अश्विनने टॉम लॅथम आणि डेवॉन कॉनवे यांना संघाच्या ४४ धावांवर तंबूत धाडले होते. त्यामुळे न्यूझीलंड संघ दबावाखाली आला होता. परंतु विलियम्सन आणि टेलरने पुढे १९६ चेंडूंमध्ये नाबाद ९६ धावांची भागिदारी साकारत संघाला विजय मिळवून दिला होता. यात विलियम्सनच्या नाबाद ५२ धावा आणि टेलरच्या नाबाद ४७ धावांचा समावेश होता.

महत्त्वाच्या बातम्या-  

‘मिस्टर ऍंड मिसेस बुमराह’ इंग्लंडमध्ये करतायत धमाल मस्ती, क्यूट सेल्फीने वेधले नेटकऱ्यांचे लक्ष

टोमणे मारण्यात पटाईत; भारतीय महिला संघाची स्तुती करताना वॉनचा विराटसेनेला टोमणा

कुलदीप यादवसाठी श्रीलंका दौरा ठरेल शेवटची संधी, संघात स्थान मिळण्याबाबत दिली ‘ही’ प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---