न्यूझीलंडचा माजी फलंदाज रॉस टेलरने आयपीएलबाबत धक्कादायक खुलासा केला आहे. रॉस टेलरने आपल्या खुलासा करताना म्हटले आहे की, “२०११मध्ये आयपीएल दरम्यान राजस्थान रॉयल्सच्या मालकाने त्याला थप्पड मारली होती.” रॉस टेलर आयपीएल २०११मध्ये राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.
रॉस टेलरने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. टेलर हा न्यूझीलंडच्या सर्वोत्तम क्रिकेटपटूंपैकी एक मानला जातो आणि त्याच्या नावावर अनेक मोठे विक्रम आहेत. टेलरने त्याच्या ‘रॉस टेलर: ब्लॅक अँड व्हाईट’ या आत्मचरित्रात खुलासा केला आहे की किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) विरुद्धच्या सामन्यात तो शून्यावर आल्यानंतर संघ मालकाने त्याला ३-४ वेळा कानशिलात लगावली होती.
टेलर आयपीएलमध्ये २००८ पासून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा भाग होता आणि त्यानंतर आयपीएल २०११ मध्ये राजस्थान रॉयल्सने त्याला विकत घेतले. तथापि, टेलरने राजस्थानसाठी फक्त एक हंगाम खेळला आणि त्यानंतर तो दिल्ली कॅपिटल्समध्ये सामील झाला. टेलरने खुलासा केला की कानशिलात फार मोठ्याने वाजल्या नाहीत, परंतु या घटनेने तो पूर्णपणे स्तब्ध झाला. टेलर म्हणाला की, “जेव्हा तुम्ही नवीन संघात जाता तेव्हा तुम्हाला तसा पाठिंबा मिळत नाही. तुम्हाला कधीच आराम वाटत नाही कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही दोन किंवा तीन सामने स्कोअरशिवाय खेळलात तर तुमच्या डोळ्यात खटकता.”
तो म्हणाला की, “उदाहरणार्थ, राजस्थान संघ मोहालीमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध खेळत होता. आम्ही १९५ धावांचा पाठलाग करत होतो आणि मी शून्यावर पायचित आऊट झालो. हॉटेलच्या वरच्या मजल्यावरील बारमधील टीम, सहाय्यक कर्मचारी आणि व्यवस्थापनाने हे अनुसरण केले. वॉर्नीला लिझ हर्लेची साथ होती.”
टेलर पुढे म्हणाला की, “यादरम्यान रॉयल्सच्या मालकांपैकी एकाने मला सांगितले, “रॉस, आम्ही तुला शून्यावर बाद होण्यासाठी दहा लाख डॉलर्स दिले नाहीत” आणि माझ्या तोंडावर ३-४ चापट मारली. तो हसत होता आणि ते जोरजोरात मारले नव्हते पण ते शक्य आहे यावर माझा विश्वास बसत नव्हता. मी या घटनेचा मुद्दा बनवला नाही, परंतु व्यावसायिक क्रीडा वातावरणात हे घडेल याची मी कल्पनाही करू शकत नाही.”
दरम्यान, रॉस टेलरने केलेल्या या खुलास्यानंतर क्रिकेट जगतात एकच खळबळ उडाली आहे. अनेकांनी याविरोधात आक्षेप उठवत सोशल मिडीयावर निषेधाच्या पोस्ट देखील शेअर केला आहे. आणि राजस्तथान संघमालक आणि साधारम क्रिकेट जगतातील अशा प्रवृत्तींवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.
महास्पोर्ट्सच्या व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-
टीम इंडियाला मिळाला नवा बॅटींग कोच! विश्वचषक मिळवून देणारा पठ्ठ्या देणार भारतीय फलंदाजांना प्रशिक्षण
BREAKING। भारताशी दोन हात करायला बांग्लादेशचा संघ जाहिर! अनपेक्षित खेळाडूकडे कर्णधारपदाची धुरा
‘…म्हणून बुमराहच्या जागी शामीला संधी मिळाली नाही’, माजी दिग्गजाने सांगितले कारण






