क्रिकेट खेळणाऱ्या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की त्यांनी आपल्या संघासाठी विश्वचषक जिंकून द्यावा. काही खेळाडू असे आहेत, ज्यांनी आपला संघ विश्वचषक जिंकल्यानंतर क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
न्यूझीलंडचा अनुभवी खेळाडू रॉस टेलरने ही असेच काही ठरवले होते. २०१९ मध्ये न्यूझीलंड संघाने एकदिवसीय विश्वचषकच्या अंतिम सामन्यात स्थान मिळवले होते. त्यावेळी त्याने क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा विचार केला होता, परंतु २०१९ च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात न्यूझीलंडचा पराभव झाल्याने त्याच्या मनाला ठेस लागली आणि त्याने निवृत्ती घेण्याचा विचार बदलला. टेलर म्हणाला बरं झालं तो विचार बदलला, त्यामुळे आज जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना खेळू शकतो.
परंतु, त्याच्याकडे आता जागतिक कसोटी चॅम्पियनशिप जिंकण्याची संधी आहे, तो या अंतिम सामन्यासाठी पूर्णपणे तयार आहे. हा अंतिम सामना खेळण्याआधी रॉस टेलरने हा खुलासा केला.
भारत आणि न्यूझीलंडमधील जागतिक कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना हा १८-२२ जूनदरम्यान साउथॅप्टनमध्ये खेळला जाणार आहे. या अंतिम सामान्यआधी रॉस टेलर हा चांगल्या फॉर्ममध्ये आहे. टेलरने इंग्लंड विरुद्धच्या दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात ८० धावा बनवल्या होत्या. न्यूझीलंडने हा कसोटी सामना ८ विकेट्सने जिंकला आणि १-० ने ही मालिका जिंकली. आता रॉस टेलरकडून अशाच प्रदर्शनाची न्यूझीलंड संघाला अपेक्षा असेल.
रॉस टेलरच्या मते भारतीय संघ हा खूप मजबूत संघ आहे. या संघात अनेक उत्कृष्ट गोलंदाज आणि फलंदाज आहे. परंतु, आता प्रश्न असा आहे की जर न्यूझीलंडने कसोटी चॅम्पियनशिप जिंकली तर तो क्रिकेट विश्वातून निवृत्ती घेईल का?(Ross Taylor says he might have retired had New Zealand won the 2019 Worldcup)
बीजे वॉटलिंग खेळणार शेवटचा कसोटी सामना
जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना न्यूझीलंड यष्टीरक्षक फलंदाज बीजे वॉटलिंगचा शेवटचा सामना असेल. या सामन्यानंतर तो निवृत्ती घेणार आहे. वॉटलिंगचा हा ७५ वा कसोटी सामना असेल. कंबरमधील दुखापतीमुळे त्याला इंग्लड विरुद्धच्या दुसऱ्या सामन्याला मुकावे लागले, परंतु त्याने अंतिम सामन्यासाठी संघात वापसी केली आहे.
त्याने स्टफ डॉट कॉम डॉट न्यूझीलंड सोबत बोलताना सांगितले ‘मला या सामन्याची प्रतीक्षा असेल. हा सामना मनोरंजक असेल आणि मी या सामन्यात उत्कृष्ट प्रदर्शन करण्याचे प्रयत्न करेल, मी त्याचप्रमाणे मैदानात उतरेल जसे प्रत्येक सामन्यासाठी उतरतो, माझा हेतू फक्त सामना जिंकण्याचे असेल.’
वॉटलिंगने २००९ मध्ये आंतराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. तो म्हणाला की ‘मी भाग्यवान आहे की माझ्या एवढ्या मोठ्या कारकिर्दीमध्ये कोणतीच फिटनेस समस्या आल्या नाहीत. तो पुढे म्हणाला ‘एक क्रिकेटपटू म्हणून छोट्या-मोठ्या दुखापती होत राहतात, काही वेळेस कंबरेचे दुखणे आले परंतु वेळेनुसार त्यांना सामोरे जाणे शिकलो आहे. मी भाग्यवान आहे की मला आतापर्यंत कोणतीच मोठी दुखापत झाली नाही.’
तो पुढे म्हणाला ‘न्यूझीलंडकडून खेळताना मी या वेळेचा पूर्ण उपयोग केला आहे आणि ही वेळ माझ्यासाठी एक अविस्मरणीय प्रवास होता.’
इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर तो बोलला ‘इंग्लंडला त्यांच्या घरी हरवले हे खूप विशेष होते. आम्ही प्रयत्न करु की तोच फॉर्म आम्ही अंतिम सामन्यात राखू. ‘
महत्वाच्या बातम्या
मेहनतीला पर्याय नाही! WTC च्या अंतिम सामन्यापूर्वी आर अश्विन करतोय कसून सराव, व्हिडिओ व्हायरल
अमेरिका संधीचे प्रवेशद्वार! स्मित पटेलनंतर ‘हा’ खेळाडूही दिसणार अमेरिकेत क्रिकेट खेळताना
लईच भारी! साउथम्प्टनमध्ये दाखल झाल्यानंतर न्यूझीलंड संघाने केली पार्टी, वॅग्नर बनला शेफ