शनिवारच्या (दि. 6 मे) डबल हेडर सामन्यातील दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स वि. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात खेळला जाणार आहे. या सामन्याला सायंकाळी 7.30 वाजता सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी आयपीएल 2023च्या या 50व्या सामन्यात 7 7 वाजता उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकत बेंगलोर संघ गुणतालिकेतील स्थान बळकट करण्याचा प्रयत्न करेल, तर दिल्ली संघ स्पर्धेत पुनरागमन करण्याचा प्रयत्न करेल.
या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघात केदार जाधव (Kedar Jadhav) याची एन्ट्री झाली आहे. तसेच, दिल्ली कॅपिटल्स संघात मायदेशी गेलेल्या एन्रीच नॉर्कियाच्या जागी मुकेश कुमार संघात परतला आहे, तर इतर परदेशी खेळाडू म्हणून मिचेल मार्शचा संघात समावेश आहे.
🚨 Toss Update 🚨@RCBTweets win the toss and elect to bat first against @DelhiCapitals.
Follow the match ▶️ https://t.co/8WjagffEQP #TATAIPL | #DCvRCB pic.twitter.com/uLyKNYrdwE
— IndianPremierLeague (@IPL) May 6, 2023
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
दिल्ली कॅपिटल्स-
डेविड वॉर्नर (कर्णधार), फिलिप सॉल्ट (यष्टीरक्षक), मिचेल मार्श, रायली रुसो, मनीष पांडे, अमन हकीम खान, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मुकेश कुमार, ईशांत शर्मा, खलील अहमद
दिल्लीचे इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट खेळाडू-
चेतन साकारिया, ललित यादव, रिपल पटेल, प्रवीण दुबे, अभिषेक पोरेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर–
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, ग्लेन मॅक्सवेल, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), केदार जाधव, वानिंदू हसरंगा, कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, जोश हेजलवूड
बेंगलोरचे इम्पॅक्ट सब्स्टिट्यूट खेळाडू-
हर्षल पटेल, सुयश प्रभुदेसाई, विजयकुमार विशक, मायकेल ब्रेसवेल, शाहबाज अहमद. (Royal Challengers Bangalore have won the toss and have opted to bat IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
13 वर्षानंतर चेपाॅकवर मुंबईचा पराभव, विजयासह चेन्नई गुणतालिकेत दुसर्या स्थानी
नितीश राणाच्या पत्नीला त्रास देणाऱ्या 2 तरुणांना त्यांच्याच घरातून अटक, काय झालेलं वाचाच