रविवारी (दि. 2 एप्रिल) क्रिकेटप्रेमींना इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेत डबल हेडर सामन्यांची मजा लुटण्याची संधी मिळत आहे. या दिवशी स्पर्धेतील चौथा सामना सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात रंगला. त्यानंतर पाचवा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात 7.30 वाजता खेळला जाणार आहे. त्यापूर्वी दोन्ही संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक बेंगलोर संघाने जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. मागील हंगामात गुणतालिकेत शेवटच्या स्थानी राहिलेला मुंबई संघ आयपीएल 2023 हंगामात विजयी सुरुवात करण्याचा प्रयत्न करेल.
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघात फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis), मायकल ब्रेसवेल, ग्लेन मॅक्सवेल आणि रीस टोप्ले हे विदेशी खेळाडू असणार आहेत. तसेच, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात टीम डेविड, कॅमरून ग्रीन, जोफ्रा आर्चर आणि जेसन बेहरेनडॉर्फ हे विदेशी खेळाडू असणार आहेत.
🚨 Toss Update from Bengaluru 🚨@RCBTweets win the toss and elect to field first against @mipaltan.
Follow the match ▶️ https://t.co/ws391sGhme#TATAIPL | #RCBvMI pic.twitter.com/vZyr6ex1hY
— IndianPremierLeague (@IPL) April 2, 2023
आपली 𝐁𝐀𝐓𝐓𝐈𝐍𝐆 आहे! 🪙
RCB have won the toss & they will bowl first 💪#OneFamily #RCBvMI #MumbaiMeriJaan #MumbaiIndians #IPL2023 #TATAIPL
— Mumbai Indians (@mipaltan) April 2, 2023
बेंगलोर आणि मुंबई इंडियन्स संघ यांच्यात खूप मोठा फरक आहे. तो असा की, बेंगलोर संघाने आतापर्यंत एकही ट्रॉफी जिंकली नाहीये. मागील हंगामात फाफच्या याच्या नेतृत्वाखाली बेंगलोर संघ गुणतालिकेत चौथ्या स्थानी विराजमान झाला होता. दुसरीकडे, मुंबई हा आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ आहे. मुंबईने रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नेतृत्वाखाली 5 वेळा विजेतेपद पटकावले आहे. आता या स्पर्धेत दोन्ही संघ कशी कामगिरी करतात हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Royal Challengers Bangalore have won the toss and have opted to field)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर
विराट कोहली, फाफ डू प्लेसिस (कर्णधार), ग्लेन मॅक्सवेल, मायकल ब्रेसवेल, शाहबाज अहमद, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, हर्षल पटेल, आकाश दीप, रीस टोप्ले, मोहम्मद सिराज
मुंबई इंडियन्स
रोहित शर्मा (कर्णधार), ईशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, कॅमरून ग्रीन, तिलक वर्मा, टीम डेविड, नेहल वढेरा, ऋतिक शोकीन, पीयुष चावला, जोफ्रा आर्चर, अर्शद खान
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सनरायझर्सला बोल्टचा झटका! खाते न खोलू देता हैदराबादचे दोन फलंदाज तंबूत, पाहा व्हिडिओ
उमरानने ताशी 149.3 किमीच्या गतीने पडिक्कलला टाकला चेंडू, स्टंपने मारल्या कोलांटी उड्या; पाहा Video