मुंबई । आयपीएल -2020 चे नवीन वेळापत्रक प्रसिद्ध झाले आहे, जे यूएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. सर्व संघ आयपीएलच्या 13 व्या हंगामाची तयारी करीत आहेत. याशिवाय ते सोशल मीडियावरही खूप अॅक्टिव्ह असतात. भारतातील वाढत्या कोविड -१९ प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी संयुक्त अरब अमिराती (युएई) मध्ये ही लीग होणार आहे. दरम्यान, संघ आणि खेळाडू सोशल मीडियावर चाहत्यांसाठी फोटो-व्हिडिओ शेअर करीत आहेत.
आपल्या पहिल्या विजेतेपदाच्या शोधात असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) संघाने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यात त्यांनी विचारले की कोणत्या संघाविरुद्धचा सामना पाहण्यास उत्सुक आहेत? या ट्विटमध्ये राजस्थान रॉयल्सचा जुना लोगो लावण्यात आला होता, त्यानंतर माजी चॅम्पियन असलेल्या राजस्थानने या संघाला ट्रोल केले.
With the schedule for the Dream11 IPL announced, which fixture are you most looking forward to, 12th Man Army? ????????#PlayBold #IPL2020 #WeAreChallengers pic.twitter.com/uTPe34F4yN
— Royal Challengers Bangalore (@RCBTweets) September 7, 2020
या ट्वीटला उत्तर म्हणून राजस्थान संघाने सोमवारी एक फोटो शेअर केला, ज्यात एक कार्टून मी राजस्थान संघाचा योग्य लोगो वापरेन असे एकच वाक्य अनेक वेळा लिहित आहे.
Hi @RCBTweets ????????♂️ https://t.co/hIPurBAiWJ pic.twitter.com/MYhh557U6t
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) September 7, 2020
19 सप्टेंबर रोजी लीगच्या 13 व्या हंगामाचा पहिला सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स आणि उपविजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघात 19 सप्टेंबर रोजी होईल. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा पहिला सामना विराट कोहलीच्या नेतृत्वात, 21 सप्टेंबरला हैदराबादशी सामना रंगणार आहे.