आयपीएल 2023 मध्ये रविवारी दोन सामने खेळले जातील. दिवसातील पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर हे आपल्या घरच्या मैदानावर गुणतालिकेत अव्वलस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचा सामना करतील. चिन्नास्वामी स्टेडियम येथे होणाऱ्या या सामन्यात आरसीबी सलग तेराव्या वर्षी आपली सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न करेन. गो ग्रीन उपक्रमाच्या अंतर्गत आरसीबीचे खेळाडू या सामन्यात हिरव्या रंगाची जर्सी घालून उतरतील.
RCB’s Green Game will be played on the 23rd of April, against Rajasthan Royals at the Chinnaswamy stadium.
Our special green jerseys are made of 100% recycled material and you can now get your hands on them, on the RCB Website and App. #PlayBold #ನಮ್ಮRCB #IPL2023 #GoGreen pic.twitter.com/E4uSUfpK2Y
— Royal Challengers Bengaluru (@RCBTweets) April 13, 2023
आयपीएलमधील सर्वात प्रसिद्ध फ्रॅंचायजीपैकी एक असलेल्या आरसीबीने 2011 मध्ये लोकांमध्येच पर्यावरण संवर्धन व वनरक्षण याबाबत जनजागृती होण्यासाठी गो ग्रीन उपक्रम सुरू केला होता. प्रत्येक हंगामातील एक सामना या उपक्रमांतर्गत खेळण्याचा निर्णय त्यांनी घेतलेला. त्यासाठी आरसीबीचे खेळाडू हिरव्या रंगाची जर्सी घालून मैदानात उतरत असतात. तसेच सपोर्ट स्टाफही हिरव्या कपड्यांमध्ये दिसून येतो.
आरसीबीने आपल्या सोशल मीडिया हँडलवर याबाबत माहिती देताना लिहिले,
’23 एप्रिल रोजी राजस्थानविरुद्ध आपण गो ग्रीन सामना खेळत आहोत. आपली ग्रीन जर्सी ही पूर्णपणे पुन्हा एकदा वापरण्याजोग्या साहित्यापासून बनवली आहे.’
त्यासोबतच संघाद्वारे पोस्ट करण्यात आलेल्या छायाचित्रात विराट कोहलीसह कर्णधार फाफ डू प्लेसिस, ग्लेन मॅक्सवेल व दिनेश कार्तिक हे दिसून येत आहेत.
आरसीबीच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरसीबी हा जगातील पहिला कार्बन न्यूट्रल संघ आहे. आम्ही सातत्याने लोकांना पर्यावरण संवर्धनाविषयी जागरूक करत आहोत.
आरसीबीसाठी हा हंगाम आतापर्यंत संमिश्र गेला आहे. आरसीबीने खेळलेल्या सहापैकी तीन सामन्यात त्यांना पराभूत व्हावे लागले तर तीन सामन्यात त्यांनी विजय मिळवला. दुसरीकडे राजस्थान सहापैकी चार सामन्यात विजय मिळवून गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर काबीज आहे.
(Royal Challengers Bengaluru Wear Green Jersey Against Rajasthan Royals In IPL 2023 For Go Green Initiative)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘जेव्हा धोनी निघून जाईल, तेव्हा त्याचे महत्त्व कळेल…’, इंग्लंडच्या दिग्गजाची भावूक करणारी प्रतिक्रिया
बीसीसीआयपुढे नमलं पाकिस्तान! आशिया चषकासाठी आला नवीन प्रस्ताव, जाणून घ्याच