आयपीएलमध्ये नेहमीप्रमाणे सेलिब्रेशनवर नवीन वाद सुरू झालेला आहे. पंजाबविरुद्धच्या सामन्यात लखनौचा गोलंदाज दिग्वेश सिंगने पायावर कुऱ्हाड मारली. दिग्वेशने विकेटचा आनंद अशा प्रकारे साजरा केला की प्रथम त्याला अनुभवी सुनील गावस्कर यांनी फटकारले आणि आता बीसीसीआयने त्याला शिक्षाही केली आहे. दिग्वेशला बीसीसीआयने मोठा दंड ठोठावला आहे, तसेच आचारसंहितेचे उल्लंघन केल्याबद्दल एक डिमेरिट पॉइंटही ठोठावला आहे.
लखनौ की संघाने प्रथम फलंदाजी केली, पंजाब समोर 172 धावांचे आव्हान दिले. पंजाब कडून ओपनिंग साठी प्रियांश आर्य आणि प्रभसिमरन सिंग हे दोघे आले. प्रियांश आर्य जवळ पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करण्याची संधी होती.परंतु, दिग्वेश सिंगने 8 धावा मिळविल्या व प्रियांश आर्य ला परत पाठवून लावले. प्रियांश च्या विकेट नत्र द्वेष त्याच्या जवळ जाऊन नोटबुक सेलिब्रेशन करताना दिसून आला. यामुळे गावस्कर यांनी दिग्वेशला खडे बोल सुनावले.
हे पाहिल्यानंतर बीसीसीआयही कृतीत उतरले. आयपीएलने लागू केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ‘लखनऊ सुपर जायंट्सचा गोलंदाज दिग्वेशला सामना शुल्काच्या 25 टक्के दंड ठोठावण्यात आला आहे. त्याला एक डिमेरिट पॉइंट देखील देण्यात आला आहे. दिग्वेशला आचारसंहितेच्या कलम 2.5 अंतर्गत लेव्हल-1 मध्ये दोषी आढळले, जे त्याने स्वीकारले.’
पंजाब किंग्ज संघाने लखनौचा एकतर्फी अंदाजात पराभव केला. प्रियांश आर्यच्या विकेटनंतर, प्रभसिमरन सिंग, श्रेयस अय्यर आणि नेहल वडेरा यांनी गोलंदाजांची चांगलीच तारीफ केली. 17 व्या षटकात पंजाब संघाने 8 विकेट्सने सामना जिंकला. लखनौचा हा दुसरा पराभव होता.






