आयपीएल (इंडियन प्रीमियर लीग) फ्रॅंचायजी लखनऊ सुपर जायंट्स संघाचे मालक असलेल्या आरपीएसजी सोमवारी (२५ जुलै) दक्षिण आफ्रिका (सीएसए) टी२० लीगबाबत मोठी घोषणा केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या या सीएसए टी२० लीगमध्ये आरपीएसजी ग्रुपने डरबन फ्रॅंचायजी विकत घेतली आहे. या फ्रॅंचायजीच्या मुख्य प्रशिक्षकपदी लांस क्लुजनर यांना नियुक्त केले आहे.
लांस क्लुजनर (Lance Klusener) हे दक्षिण आफ्रिकेचे माजी अष्टपैलू आहेत. त्यांनी १९९६ पासून ते २००४ पर्यंत ४९ कसोटी आणि १७१ वनडे सामने खेळले आहेत. त्या सामन्यांमध्ये त्यांनी अनुक्रमे ८० आणि १९२ विकेट्स घेताना १९०६ आणि ३५७६ धावा केल्या आहेत. ते म्हणाले, “मी आरपीएसजीचा एक सदस्य झालो याबाबत आनंदी आहे. हे माझ्यासाठी एक आव्हान असल्याने त्याला सामोरे जाण्यासाठी पूर्णपणे तयार आहे. तसेच संघाची भेट घेण्यासाठीही उत्सुक आहे.”
संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी रुजू होण्याची क्लुजनर यांची ही काही पहिलीच वेळ नाही. त्यांनी सप्टेंबर २०१९ ते डिसेंबर २०२१ या काळात अफगाणिस्तान संघाचे प्रशिक्षकपद सांभाळले आहेत. त्याच्या कार्यकाळात अफगाणिस्तानने ३ पैकी १ कसोटी, ६ पैकी ३ वनडे आणि १४ पैकी ९ आंतरराष्ट्रीय टी२० सामने जिंकले आहेत. सध्या ते झिम्बाब्वेच्या पुरूष संघाचे प्रशिक्षक आहेत. तसेच टी२० लीगमध्ये त्यांनी बांगलादेश प्रीमियर लीगमध्ये (बीपीएल) राजशाही किंग्ज आणि खुलना टायगर्स या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची भुमिका पार पाडली आहे.
“I am honoured to join the RPSG family. This is a new challenge for me. It makes me very proud. I am looking forward to meet the team.” – Lance Klusener@LucknowIPL #LanceKlusener #Durban #CricketSouthAfrica pic.twitter.com/lBuEDZbLpP
— RP Sanjiv Goenka Group (@rpsggroup) July 25, 2022
आयपीएलमध्ये लखनऊ संघाला ७०९० कोटी रुपयांना विकत घेतल्यानंतर आता आयपीएसजी ग्रुपने डरबन संघासाठी बोली लावली होती. तसेच २०१६ आणि २०१७मध्ये त्यांच्याकडे रायजिंग पुणे सुपरजायट्स संघाचे हक्क होते.
दक्षिण आफ्रिकेच्या या टी२० लीगमध्ये लखनऊ संघाबरोबरच मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स या आयपीएल संघांच्या मालकांनीही संघ विकत घेतले आहेत. तसेच ही लीग पुढील वर्षी खेळली जाणार आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘आता तरी वॉर्नरवरचा बॅन हटवा!’ ऑस्ट्रेलियाच्या माजी दिग्गजाने घातलं क्रिकेट बोर्डाला साकडं
चांगली खेळी करूनही श्रेयस अय्यरला वाटतोय हा धोका! म्हटला, ‘पुढच्या सामन्यात…’
बायोपिकचे पोस्टर लाँच करताच अख्तरने विराटबद्दल केले मोठे विधान, म्हणाला ‘तो एक…..’