भारतीय संघाचा दिग्गज खेळाडू विराट कोहली याला आज कोणत्याही परिचयाची गरज नाही. त्याने आपल्या शानदार फलंदाजीने जागतिक क्रिकेटचे अनेक विक्रम मोडीत काढले आहेत. त्यामुळे त्याचे दिवाने जगाच्या पाठीवर सर्वत्र पाहायला मिळतात. विराट जगात जिथेही जातो, तिथे त्याचे चाहते असतात म्हणजे असतातच. एवढंच नाही, तर अनेक युवा क्रिकेटपटूंसाठी तो आदर्श आहे. इंडियन प्रीमिअर लीग स्पर्धेत सामना संपला की, प्रतिभावान युवा खेळाडूंना विराट सल्ले देताना दिसतो. राजस्थान रॉयल्स संघाचा युवा स्टार फलंदाज रियान पराग यानेही आयपीएलदरम्यान विराटचा सल्ला घेतला आहे. अशात त्याने आता विराटविषयी मोठे विधान केले आहे.
रियान पराग (Riyan Parag) याने भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) याचे तोंडभरून कौतुक केले आहे. पराग अनेकदा विराटशी संवाद साधतो. त्याने अलीकडेच सांगितले होते की, तो आधुनिक काळातील महान व्यक्तींचा सल्ला घेतल्याने त्याला आयपीएल 2023 हंगामातही अविस्मरणीय खेळी करण्यास मदत झाली होती.
काय म्हणाला पराग?
यावेळी त्याने असाही खुलासा केला की, त्याने विराटशी झालेल्या शेवटच्या संभाषणाचा संपूर्ण फोन कॉल रेकॉर्ड केला होता. तसेच, त्याने असेही म्हटले की, तो विराटला त्रास देऊ इच्छित नाही.
पराग म्हणाला, “माझ्या फोन कॉन्टॅक्टमधील सर्वात मोठे नाव विराट कोहली आहे. मी आमच्यात शेवटच्या झालेल्या संभाषणाचा संपूर्ण कॉल रेकॉर्ड केला होता. कारण, मला त्याला डिस्टर्ब करून त्रास द्यायचा नव्हता. जेव्हाही मला कोणत्याही सल्ल्याची गरज वाटते, तेव्हा मी त्याच्याशी बोलतो.”
Riyan Parag said "Virat Kohli is the biggest name in my phone contact, I recorded the whole call when we talked last time as I don't want to disturb him, whenever I feel I need any advice I talk with him". [Clueless HARPAL YT] pic.twitter.com/S1I0jwMX9A
— Johns. (@CricCrazyJohns) September 17, 2023
परागची आयपीएल कामगिरी
रियान पराग हा 2019पासून आयपीएल खेळतो. त्याने 2019मध्ये वयाच्या 17व्या वर्षी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केले होते. राजस्थानने त्याला 20 लाखांच्या किंमतीत आपल्या संघाचा भाग बनवले होते. परागने आतापर्यंत 5 आयपीएल हंगामात 54 सामने खेळले आहेत. यादरम्यान त्याने 16.22च्या सरासरीने 600 धावा केल्या आहेत. यामध्ये 2 अर्धशतकांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त त्याने गोलंदाजी करताना 4 विकेट्सही घेतल्या आहेत. (RR player Riyan Parag Reveals How Virat kohli important Role In His Career)
हेही वाचा-
रोहितने संघाबाहेर केलेल्या खेळाडूंना घेऊन दिग्गजाने निवडली Playing 11, Asia Cup Finalपूर्वी बातमी वाचाच
Asia Cup Finalपूर्वी लगेच जाणून घ्या कसंय हवामान, IND vs SL सामन्यावेळी पडणार का पाऊस?