इंडियन प्रीमियर लीगच्या पहिल्याच हंगामात चषकावर नाव कोरणारा राजस्थान रॉयल्स संघ यंदा संघर्ष करताना दिसत आहे. आतापर्यंत आयपीएल २०२१ मध्ये त्यांनी ५ सामने खेळले असून केवळ २ सामने जिंकण्यात त्यांना यश आले आहे. यामुळे अवघ्या ४ गुणांसह हा संघ गुणतालिकेत सहाव्या स्थानी विराजमान आहे.
नवा कर्णधार संजू सॅमसन याच्याकडून फ्रँचायझीला मोठ्या अपेक्षा असताना संघाची वाईट कामगिरी चाहत्यांसह सर्वांना निराश करत आहे. अशात माजी भारतीय क्रिकेटपटू विरेंद्र सेहवान याने संजूबद्दल मोठे वक्तव्य केले आहे.
क्रिकबझशी बोलताना माजी भारतीय सलामीवीर सेहवाग म्हणाला की, “कदाचित राजस्थान संघातील इतर खेळाडू संजूला कर्णधार बनवल्यामुळे आनंदी नसावेत. परंतु ही गोष्टही खरी आहे की, जर एखादा खेळाडू इतर कोणाला जास्त न बोलता एकटाच राहत असेल. तर त्याला संघनायक बनवल्यानंतर आपल्या संघसहकाऱ्यांमध्ये मिसळण्यासाठी वेळ लागतो.”
“जेव्हा एखादा गोलंदाज जास्त मार खातो, तेव्हा कर्णधाराने त्याला ओरडले नाही पाहिजे. फक्त त्याच्याजवळ जावे आणि त्याच्या खांद्यावर हात ठेवून म्हणावे की, असुदे एवढ्याने काही होत नाही. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार रिषभ पंतमध्ये ही गोष्ट दिसून येते. यामुळे गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढतो. त्याला वाटते की कर्णधाराचा आपल्यावर विश्वास आहे. मग आपण जाऊन कर्णधाराशी संवाद साधला पाहिजे. एव्हाना राजस्थानचे परदेशी खेळाडूही एकमेकांना जास्त बोलत नाहीत. यामुळेच त्यांचा संघ एकजूट असल्यासारखे दिसत नाही,” असे सेहवागचे पुढे म्हटले.
https://twitter.com/cricbuzz/status/1385995700865880073?s=20
आयपीएल २०२० मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार संजू सॅमसन हा राजस्थानचा कर्णधार होता. परंतु यावर्षी राजस्थान संघाने त्याला रिलीज करत यष्टीरक्षक फलंदाज संजूच्या हाती संघाच्या नेतृत्त्वाची सुत्रे सोपवली होती.
महत्त्वाच्या बातम्या-
सिराजला हलक्यात घेणाऱ्या जडेजाला वेगवान गोलंदाजाने ‘अशी’ दाखवली भिती, पाहा व्हिडिओ
विजयाच्या आनंदावर पसरलं दु:खाचं सावट, सीएसकेतील ‘या’ प्रमुख सदस्याची मालवली प्राणज्योत






