इंडियन प्रीमिअर लीग २०२२मधील १३वा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध राजस्थान रॉयल्स संघात मंगळवारी (०५ एप्रिल) खेळला जाणार आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर होणार आहे. या सामन्यात पुन्हा एकदा मोठी धावसंख्या पाहायला मिळण्याची शक्यता आहे. आयपीएलच्या १५व्या हंगामात बेंगलोरने आतापर्यंत २ सामने खेळले आहेत. त्यात त्यांना १ सामन्यात विजय, तर दुसऱ्या सामन्यात पराभव मिळाला आहे. दुसरीकडे राजस्थानने आतापर्यंत खेळलेल्या दोन्ही सामन्यात विजयी सुरुवात केली आहे.
बेंगलोरने त्यांचा पहिला सामना पंजाब किंग्सविरुद्ध झाला होता. त्यात त्यांना ५ विकेट्सने पराभव पत्करावा लागला. त्यानंतर त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सचा सामना केला. त्यात त्यांना ३ विकेट्सने विजय मिळवता आला. बेंगलोर गुणतालिकेत सातव्या स्थानी आहेत. दुसरीकडे राजस्थानने खेळलेल्या सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्सविरुद्धच्या दोन्ही सामन्यात विजय मिळवला आहे. तसेच, ते गुणतालिकेत अव्वल स्थानी आहेत.
असे असू शकतात संभावित संघ
बेंगलोरचा कर्णधार फाफ डू प्लेसिस (Faf Du Plessis) दुसऱ्या सामन्याप्रमाणे त्यांच्या तिसऱ्या सामन्यातही विजय मिळवण्याचा प्रयत्न करेल. त्यांच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बोलायचं झालं, तर खुद्द कर्णधार डू प्लेसिस अनुज रावतसह सलामीला उतरू शकतो. तसेच, मधल्या फळीत विराट कोहली, डेविड विली आणि अष्टपैलू शेरफेन रुदरफोर्ड यांना मधली फळी सांभाळावी लागेल. तसेच, यांना यष्टीरक्षक दिनेश कार्तिकही साथ देऊ शकतो. दुसरीकडे शाहबाज अहमद, वनिंदू हसरंगा, मोहम्मद सिराज आणि आकाश दीप यांच्यावर गोलंदाजीची जबाबदारी असू शकेल.
दुसरीकडे या हंगामात सलग २ सामने जिंकणाऱ्या राजस्थान संघाच्या प्लेइंग इलेव्हनबाबत बोलायचं झालं, तर जोस बटलर आणि युवा फलंदाज यशस्वी जयसवाल सामन्याची सुरुवात करू शकतात. तसेच, मधल्या फळीची जबाबदारी देवदत्त पडिक्कल, कर्णधार संजू सॅमसन (Sanju Samson) आणि शिमरॉन हेटमायर यांच्यावर असू शकते. तसेच, अष्टपैलू म्हणून रियान पराग संघात स्थान मिळवू शकेल. गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं, तर आर अश्विन, युझवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा आणि नवदीप सैनी या खेळाडूंवर गोलंदाजीची जबाबदारी असू शकते.
आमने- सामने
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि राजस्थान रॉयल्स (Royal Challengers Bangalore And Rajasthan Royals) संघ आतापर्यंत २५ वेळा आमने-सामने आले आहेत. त्यातील १२ सामने बेंगलोर संघाने, तर १० सामने राजस्थानने जिंकले आहेत. उभय संघातील ३ सामने अनिर्णित राहिले आहेत. मागील २ हंगामांपासून राजस्थान संघाला बेंगलोर संघावर विजय मिळवता आलेला नाही.
हवामान आणि खेळपट्टी
बेंगलोर आणि राजस्थानच्या सामन्यादरम्यान मुंबईचे हवामान व्यवस्थित असेल. सामन्यादरम्यान पावसाची शक्यता फक्त १० टक्के आहे. या दिवशी मुंबईतील तापमान ३१ अंश सेल्सिअरच्या आसपास असेल. आर्द्रता ७१ टक्के राहील आणि वाऱ्याचा वेग २४ किमी प्रतितास राहील. दुसऱ्या डावात दव पडू शकतात, परंतु ब्रेबॉर्न येथे दव पडू नये म्हणून अस्पाचा वापर करण्यात आला होता. या मैदानावरही याचा वापर केला जाऊ शकतो.
खेळपट्टीबाबत बोलायचं झालं, तर वानखेडेची खेळपट्टी साधारणपणे फलंदाजांसाठी फायदेशीर असते. या मैदानावर नेहमीच मोठी धावसंख्या उभारली जाते. अशात या सामन्यातही मोठी धावसंख्या उभारली जाण्याची शक्यता आहे. तरीही, सुरुवातीला ही खेळपट्टी वेगवान गोलंदाजांना मदत करते आणि चांगली स्विंगही मिळवून देते. पावरप्लेमध्ये वेगवान गोलंदाज नवीन चेंडूने कमाल करू शकतात. मात्र, नंतरच्या षटकांमध्ये फलंदाज सहजरीत्या धावांचा पाऊस पाडू शकतात.
आयपीएल २०२२ हंगामातील (IPL 2022) बेंगलोर विरुद्ध राजस्थान (RCB vs RR) सामन्याबद्दल जाणून घ्या सर्वकाही…
१. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना केव्हा होणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना ०५ एप्रिल, २०२२ रोजी खेळला जाणार आहे.
२. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना कुठे खेळवला जाणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना वानखेडे स्टेडिअम येथे खेळवला जाईल.
३. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना किती वाजता सुरु होणार?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामना भारतीय प्रमाणवेळेनुसार संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होईल. त्याआधी संध्याकाळी ७.०० वाजता नाणेफेक होईल.
४. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात कोणत्या चॅनेलवर पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण भारतात स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या चॅनेलवर पाहता येईल.
५. आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामन्याचे थेट प्रक्षेपण ऑनलाईन कसे पाहाता येईल?
– आयपीएल २०२२ मधील बेंगलोर विरुद्ध राजस्थान सामन्याचे ऑनलाईन थेट प्रक्षेपण डिज्नी प्लस हॉटस्टार या ऍपवर पाहता येईल.
यातून निवडला जाईल ११ जणांचा संघ –
रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघ: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), अनुज रावत, विराट कोहली, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), शेरफेन रुदरफोर्ड, शाहबाज अहमद, वानिंदू हसरंगा, डेविड विली, हर्षल पटेल, आकाश दीप, मोहम्मद सिराज, सिद्धार्थ कौल, कर्ण शर्मा, चामा व्ही मिलिंद, महिपाल लोमरोर, फिन ऍलन, सुयश प्रभुदेसाई, लुवनीथ सिसोदिया, अनिश्वर गौतम.
राजस्थान रॉयल्स संघ: जोस बटलर, यशस्वी जयस्वाल (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक/कर्णधार), देवदत्त पडीक्कल, शिमरॉन हेटमायर, रियान पराग, नॅथन कुल्टर-नाईल, रविचंद्रन अश्विन, युजवेंद्र चहल, ट्रेंट बोल्ट, प्रसिद्ध कृष्णा, करुण नायर, जेम्स निशम, रॅसी व्हॅन डर डुसेन, नवदीप सैनी, केसी करिअप्पा, डॅरिल मिशेल, ओबेद मॅककॉय, तेजस बरोका, कुलदीप यादव, अनुनय सिंग, कुलदीप सेन, ध्रुव जुरेल, शुभम गढवाल.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
LSGvsSRH | आवेशच्या भेदक माऱ्यानंतर होल्डरचा परिपूर्ण शेवट, लखनऊकडून हैदराबाद १२ धावांनी चितपट