आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या सुपर १२ टप्प्यातील गट २ च्या सामन्यात बुधवारी (२७ ऑक्टोबर) स्कॉटलंड संघ नामिबियाविरुद्ध १०९ धावाच करू शकला. आपला सहावा आंतरराष्ट्रीय सामना खेळताना रूबेन ट्रम्पलमनने कारकिर्दीतील सर्वोत्तम गोलंदाजी करत १७ धावांत तीन बळी घेतले. डावखुरा वेगवान गोलंदाज जेन फ्रायलिंकने त्याला चांगली साथ देत, किफायतशीर गोलंदाजी करताना चार षटकांत १० धावा देऊन दोन बळी घेतले. आयसीसीने ट्रम्पलमनचा व्हिडिओ शेअर करत त्याचे कौतुक केले आहे.
टी-२० विश्वचषकात असे दुसऱ्यांदा घडले आहे, जेव्हा एका गोलंदाजाने सामन्याच्या पहिल्याच षटकात ३ विकेट घेतल्या. २३ वर्षीय ट्रंपलमनच्या आधी, श्रीलंकेच्या अँजेलो मॅथ्यूजने टी २० विश्वचषक २००९ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध डावाच्या पहिल्या षटकात (सामन्याचा दुसरा डाव) १ धाव देऊन ३ बळी घेतले होते. ट्रम्पलमनच्या या गोलंदाजीला आयसीसीने टी-२० विश्वचषक सामन्यातील सर्वात खळबळजनक षटक म्हणूनही वर्णन केले आहे.
नामिबियाचा कर्णधार गेरहार्ड इरास्मसने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि ट्रम्पलमनने पहिल्याच षटकातच तीन विकेट घेत निर्णय योग्य असल्याचे सिद्ध केले. जॉर्ज मुनसे (०) याला सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर ट्रम्पलमनने झेलबाद केले, तर तिसर्या चेंडूवर कॅलम मॅक्लिओड (०) यष्टीरक्षक जेन ग्रीनकरवी झेलबाद केले.
पुढच्या चेंडूवर ट्रम्पलमनने सुरेख फॉर्मात असलेल्या कर्णधार रिची बेरिंग्टनला (०) पायचीत करून स्कॉटलंडची तीन बाद दोन अशी अवस्था केली. अशाप्रकारे, टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एखाद्या गोलंदाजाने पहिल्याच षटकात तीन बळी घेण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे.
https://www.instagram.com/p/CViRg5HlNbp/
स्कॉटलंडच्या डावात केवळ सात चौकार आणि दोन षटकार मारले गेले, यावरून नामिबियाच्या गोलंदाजांच्या वर्चस्वाचा अंदाज लावता येतो. स्कॉटलंडकडून एकाही फलंदाजाला चांगला खेळ करता आला नाही. सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या मायकेल लीस्कने सर्वाधिक ४४ धावा केल्या. त्याच्याशिवाय केवळ ख्रिस ग्रीव्हज (२५) आणि सलामीवीर मॅथ्यू क्रॉस (१९) यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.
महत्त्वाच्या बातम्या –
कमाल राहुल आणि हिटमॅन रोहितच्या खांद्यावरच न्यूझीलंडविरुद्धची जबाबदारी; वाचा ही आकडेवारी
‘तुम्ही कोणत्या देशाचे याने फरत पडत नाही’, वकार युनूसला माजी पाकिस्तानी खेळाडूचाच घरचा आहेर





