जगातील सर्वात जुन्या आणि प्रतिष्ठित विम्बल्डन टेनिस स्पर्धेला 3 जुलैपासून सुरुवात होत आहे. तब्बल 146 वर्षे जुन्या असलेल्या या ग्रँड स्लॅमचा यंदाचा 136वा हंगाम असेल. या स्पर्धेचे आयोजन करण्यासाठीही खास तयारी केली जाते. टेनिस कोर्टच्या सुरक्षेसाठी पोलीस आणि सुरक्षारक्षक तैनात करण्याव्यतिरिक्त आकाशात उडणाऱ्या कबुतर आणि इतर पक्षांपासून कोर्टला वाचवण्यासाठी विशेष तयारी केली जाते. यासाठी एका ससाण्याला तैनात केले जाते.
गवताच्या कोर्टवर खेळल्या जाणाऱ्या या स्पर्धेत कबुतरांपासून कोर्टला वाचवण्यासाठी रूफस (Rufus) नावाच्या ससाणा असतो. हॅरिस प्रजातीच्या या ससाण्यावर हे काम सोपवलेले असते. हा ससाणा ऑल इंग्लंड लॉन टेनिस संघटना व क्रॉकेट क्लब यांनी पाळला आहे. रूफसला विम्बल्डन (Wimbledon) स्पर्धेच्या आयोजनाचा महत्त्वाचा सदस्य मानले जाते. रूफसपूर्वी 2000 ते 2003 यादरम्यान हे काम हमीश नावाचा ससाणा करायचा.
रूफसला विम्बल्डन कोर्टची सुरक्षा करताना आता जवळपास 15 वर्षे झाली आहेत. तो जेव्हा 16 आठवड्यांचा होता, तेव्हापासून हे काम करत आहे. रूफस सामन्यादरम्यान सातत्याने हवेत उडत असतो आणि कबुतरांना कोर्टच्या जवळपासही येऊ देत नाही.
सन 1877मध्ये गवताच्या कोर्टवर झालेली स्पर्धेची सुरुवात
विम्बल्डन स्पर्धेची सुरुवात 1877मध्ये गवताच्या कोर्टवर झाली होती. यानंतर 146 वर्षांच्या इतिहासात ही स्पर्धा गवताच्या कोर्टवरच आयोजित केली जात आहे. 4 ग्रँड स्लॅममध्ये ही एकमेव स्पर्धा गवताच्या कोर्टवर खेळली जाते. इतर 3 ग्रँड स्लॅम (Grand Slam) स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियन ओपन आणि यूएस ओपन हार्ड कोर्टवर, तर फ्रेंच ओपन क्ले कोर्टवर (लाल मातीचं कोर्ट) खेळली जाते.
यावेळी विम्बल्डनमध्ये बक्षीस रक्कम 11 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामध्ये दोन्ही एकेरी (सिंगल्स) विजेत्यांना जवळपास 24.49 कोटी रुपये मिळतील. तसेच, उपविजेत्या खेळाडूंना जवळपास 12.25 कोटी रुपये मिळतील. (rufus the hawk eagle gets special duty during wimbledon know all about here)
महत्वाच्या बातम्या-
BREAKING: टेनिसचा ‘युगंधर’ बनला जोकोविच! फ्रेंच ओपनसह 23वे ग्रँडस्लॅम केले नावे
स्पेनच्या पठ्ठ्याला नमवत जोकोविचची French Open Finalमध्ये धडक, इतिहास रचण्यापासून फक्त एक पाऊल दूर