---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकेचा सामना सुरू होण्यापूर्वी क्रिकेटचा ‘हा’ नियम बदलला

On: गुरूवार, जून 9, 2022 3:04 PM
Rishabh-Pant-South-Africa
---Advertisement---

भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिकामध्ये पाच आंतरराष्ट्रीय टी२० सामन्यांच्या मालिकेला आजपासून (९ जून) सुरुवात होत आहे. या सामन्यासाठी क्रिकेटमधील काही नियमांमध्ये बदल करण्यात येणार आहे. आजवर अनेकदा खेळाडूंचे आरोग्य चांगले रहावे यासाठी क्रिकेमधील काही नियम बदल्याचे आपल्या ऐकिवात असेल. तसेच या मालिकेत देखील खेळाडूंच्या आरोग्यावर भारतीय परिस्थितीचा परिणाम होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

या मालिकेतील पहिला सामना आज ९ जून रोजी दिल्लीतील अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या सामन्यापूर्वी नियमांमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. वास्तविक, जून महिन्यात उत्तर भारतात तीव्र उष्णता असते, त्यामुळे टीम इंडिया मायदेशात सामने खेळू शकत नाही. मात्र यंदा भारत दक्षिण आफ्रिकेचे यजमानपद भूषवत असून दोन्ही संघांचे खेळाडू दिल्लीच्या कडक उन्हामुळे हैराण झाले आहेत. या समस्येवर मात करण्यासाठी १० षटकांनंतर ड्रिंक्स ब्रेक करण्याचा नियम लागू करण्यात आला आहे.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेम्बा बावुमा टी२० मालिकेपूर्वी पत्रकार परिषदेत म्हणाला होता की, “आम्हाला अपेक्षा होती की इथे खूप गरम होईल, पण इतके गरम होईल, हे माहित नव्हते. मला वाटते की आम्ही नशीबवान आहोत की सामने रात्री होणार आहेत, कारण रात्रीची उष्णता सुसह्य असेल.”

एका वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार, भारत आणि दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या पहिल्या टी२० सामन्यात उष्णतेपासून वाचण्यासाठी दोन्ही संघांना १० षटकांनंतर ड्रिंक ब्रेक घेण्याची परवानगी असेल. यावेळी दिल्लीतील उष्णतेमुळे तापमान ४०ते ४५ दरम्यान राहते, त्यामुळे या नियमामुळे खेळाडूंना मोठा दिलासा मिळू शकतो.

दरम्यान, टी२० हा क्रिकेटमधील एक छोटा प्रकार आहे ज्यामध्ये ड्रिंक्स ब्रेक घेण्याची परवानगी नसते, पण गेल्या वर्षी युएई मध्ये झालेल्या टी२० विश्वचषक दरम्यान उष्णतेच्या पार्श्वभूमीवर, आयसीसी ने देखील हा नियम लागू केला होता. त्यानंतर आता या मालिकेमध्ये या नियमाची पुनरावृत्ती होताना दिसणार आहे.

व्हॉट्सअपवर अपडेट्स मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-

इंग्लंडने ३ रनांनी मॅच मारली, आणि ऑस्ट्रेलियाच्या ‘त्या’ ऐतिहासिक पराभवामुळे हसी क्रिकेटर झाला

रिषभ पंत असेल भारताचा टी२०तील आठवा कर्णधार, पाहा याआधीच्या कॅप्टन्सची लिस्ट आणि त्यांची कामगिरी

धडाकेबाज क्रिकेटपटू असूनही ‘दारूडा’ म्हणून ओळखला जाणारा एँड्र्यू सायमंड्स

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---