पॅरिस पॅरालिम्पिक 2024 च्या चौथ्या दिवशी म्हणजे 1 सप्टेंबर (रविवारी) भारतीय अॅथलीट्सनं आपली धमक दाखवत देशाला आणखी एक पदक मिळवून दिलं.
रविवारी प्रीती पाल हिनं महिलांच्या 200 मीटर शर्यतीत (टी35) कांस्यपदक जिंकलं. तिनं 30.01 सेकंदात ही रेस पूर्ण केली. या पॅरालिम्पिकमध्ये प्रीतीचं हे दुसरं कांस्यपदक आहे. यापूर्वी तिनं 100 मीटरमध्ये कांस्यपदक जिंकलं होतं. तिनं 14.21 सेकंदांची वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवली होती. यासह, पॅरिस पॅरालिम्पिक 2024 मधील भारताच्या एकूण पदकांची संख्या 7 (1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य) झाली आहे.
पॅरालिम्पिकच्या टी35 इव्हेंट मध्ये असे खेळाडू भाग घेतात, ज्यांना हायपरटोनिया, अटेक्सिया आणि एथटोसिस सारखे विकार असतात. उत्तर प्रदेशातील मुझफ्फरनगर येथील एका शेतकर्याची मुलगी असलेल्या प्रीतीला लहान वयातच सेरेब्रल पाल्सीची माहिती मिळाली होती.
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये दुसरं पदक जिंकल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रीतीचं अभिनंदन केलं. मोदींनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ‘X’ वर लिहिलं, “प्रीति पाल हिनं ऐतिहासिक कामगिरी केली आहे. महिलांच्या 200 मीटर टी35 स्पर्धेत प्रीतीनं कांस्यपदक जिंकलं, जे पॅरालिम्पिक 2024 मधील तिचं दुसरं पदक आहे. ती भारताच्या नागरिकांसाठी प्रेरणा आहे. तिचं समर्पण आश्चर्यकारक आहे.”
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये पदक जिंकणारे भारतीय
(1) अवनी लेखरा (नेमबाजी) – सुवर्णपदक, 10 मीटर एअर रायफल (एसएच1)
(2) मोना अग्रवाल (नेमबाजी) – कांस्यपदक, 10 मीटर एअर रायफल (एसएच1)
(3) प्रीति पाल (अॅथलेटिक्स) – कांस्यपदक, 100 मीटर शर्यत (टी35)
(4) मनीष नरवाल (नेमबाजी)- रौप्य पदक, 10 मीटर एअर पिस्तूल (एसएच1)
(5) रुबीना फ्रान्सिस (नेमबाजी) – कांस्यपदक, 10 मीटर एअर पिस्तूल (एसएच1)
(6) प्रीति पाल (अॅथलेटिक्स) – कांस्यपदक, 200 मीटर शर्यत (टी35)
(7) निशाद कुमार (अॅथलेटिक्स) – रौप्य पदक, हाय जंप (टी47)
हेही वाचा –
प्रशिक्षक गंभीरने निवडली त्याची आवडती ‘ऑल टाइम इंडिया इलेव्हन’, चक्क रोहितला वगळले
“मी धोनीला कधीच माफ करणार नाही”, योगराज सिंग यांचे पुन्हा धोनीवर गंभीर आरोप
गस ऍटकिन्सनच्या अष्टपैलू खेळीच्या जोरावर इंग्लंडचा श्रीलंकेवर मोठा विजय, लॉर्ड्सवर 33 वर्षांनी घडवला इतिहास