आयपीएल 2025 स्पर्धेचा हंगाम सध्या सुरू आहे,सर्वच संघ सध्या प्लेऑफच्या दिशेने वाटचाल करत आहेत. त्यामुळे सर्वच सामन्यात चुरस पाहायला मिळत आहे. तसेच आरसीबी संघ आता पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. काल झालेल्या म्हणजेच 20 एप्रिल रोजी आरसीबी विरुद्ध पंजाब किंग्स सामना खेळला गेला, या सामन्यात आरसीबीने पंजाब कडून पराभवाचा बदला घेत शानदार विजय मिळवत पॉईंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानावर झेप घेतली आहे.
बंगळुरूसाठी विराट कोहलीने 54 चेंडूत 73 धावा करत शानदार पारी खेळली. यासाठी त्याला सामनावीर हा पुरस्कार देखील देण्यात आला. याचबरोबर आता बीसीसीआयने सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट जाहीर केले आहे. या कॉन्ट्रॅक्टमध्ये विराट कोहली अ श्रेणीमध्ये आहे. तुम्हाला माहिती आहे का, विराट कोहली क्रिकेटद्वारे किंवा आयपीएल स्पर्धेद्वारे किती पैसे कमावतो चला तर जाणून घ्या.
विराट कोहलीची क्रिकेटमधून येणारी कमाई एकूण 21 कोटींची आहे, त्याच्या आयपीएल करार 21 कोटी रुपये इतका आहे. बीसीसीआय त्याला वर्षाला सात कोटी रुपये देते. तसेच आयपीएल हंगामामध्ये 75 टक्के पेक्षा जास्त सामने खेळल्यास प्रत्येक सामन्यामागे त्याला 45 लाख रुपये भेटतात. याचबरोबर आयपीएलच्या प्रत्येक सामन्यानंतर त्याला 7.5 लाख रुपये इतके मानधन मिळते. इतकेच नाही तर प्रत्येक वनडे सामन्यासाठी त्याला सहा लाख रुपये तसेच, प्रत्येक टी-20 सामन्यासाठी त्याला तीन लाख रुपये भेटतात.
विराट कोहलीने आतापर्यंत क्रिकेटच्या सर्व फॉरमॅटमध्ये एकूण 27,503 धावा केल्या आहेत. त्याने कसोटी क्रिकेटमध्ये एकूण 123 सामान्यांमध्ये 9,230 धावा केल्या आहेत, याचबरोबर त्याने वनडेमध्ये 302 सामन्यांमध्ये 14,181 धावा केल्या आहेत. तसेच टी20 मध्ये त्याने 125 सामन्यांमध्ये 4,188 धावा केल्या आहेत.






