पुणे, 13 ऑगस्ट 2024: रूपाली एससी, स्निग्मय पुणे एफसी आणि परशुरामियन्स संघांनी पीडीएफए सुपर डिव्हिजन लीगमध्ये आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवले.
गंगा लिजेंड्स, बावधन मैदानावर सुरू असलेल्या लीगमध्ये सनी पवारच्या (४९व्या, ७०व्या) आणि संगोराम सातवच्या (३रा) एक गोलच्या बळावर रूपाली एससीने उत्कर्ष क्रीडा मंचवर ३-० अशी मात केली.
आणखी एका सामन्यात स्निग्मय एफसी, पुणेने गेम ऑफ गोल्स एफसीचा 3-1 असा पराभव केला. गुलाम अन्सारीची (14वा, 26वा, 34वा) गोल हॅट्ट्रिक त्यात निर्णायक ठरली. गेम ऑफ गोल्स एफसीसाठीचा एकमेव गोल सूरज थापाने (54वे) केला.
नंतर परशुरामियन्सने चुरशीच्या लढतीत डेक्कन इलेव्हन एफसी ‘अ’ संघाला 2-2 असे बरोबरीत रोखले.
रोहन देशमुखने (31व्या) परशुरामियन्सचे खाते उघडले. मात्र, यश महापात्रा (५२वे) डेक्कन इलेव्हन एफसी ‘अ’ ला बरोबरी साधून दिली. त्यानंतर साद शेख (६५व्या) संघाला आघाडीवर नेले. परंतु, उत्तरार्धात निखिल पडवळने (७६वे) परशुरामियन्ससाठी बरोबरी साधली.
सदीम मिया (8वा आणि 31वा) आणि हर्ष दरबा (51वा) यांच्यामुळे एआयवायएफए स्काय हॉक्सने दिएगो ज्युनियर्सला 3-1 असे रोखले. प्रतिस्पर्धी संघाकडून जॉन चल्लाने (62 वे) गोल केला.
दुसऱ्या सामन्यात, इंद्रायणी एससीने संघवी एफसीचा 5-0 असा धुव्वा उडविला. विजयी संघाकडून आयुष दीपक (३९वा), सूरज भैरट (४९वा), अजय राठोड (६५वा), शिवकुमार शेट्टी (८५वा) आणि शुभम गायकवाडने (८७वा) प्रत्येकी एक गोल केला.
निकाल –
सुपर डिव्हिजन :
स्निग्मय पुणे एफसी: 3 (गुलाम अन्सारी 14वा, 26वा, 34वा) विजयी वि. गेम ऑफ गोल्स एफसी: 1 (सूरज थापा 54वा)
रूपाली एससी: 3 (संगोराम सातव 3रा; सनी पवार 49वा, 70वा) विजयी वि. उत्कर्ष क्रीडा मंच: 0
परशुरामियन्स: २ (रोहन देशमुख ३१वे; निखिल पडवळ ७६वे) बरोबरी वि. डेक्कन इलेव्हन एफसी ‘ए’: २ (यश महापात्रा ५२वे; साद शेख ६५वे).
एआयवायएफए स्काय हॉक्स: 3 (सदीम मिया 8वा, 31वा; हर्ष दरबा 51वा) बिजयी वि. दि एगो ज्युनियर्स: 1 (जॉन चल्ला 62वा)
इंद्रायणी एससी: 5 (आयुष दीपक 39वा; सूरज भैरट 49वा; अजय राठोड 65वा; शिवकुमार शेट्टी 85वा; शुभम गायकवाड 87वा) विजयी वि. संघवी एफसी: 0
हेही वाचा-
पुढचे ऑलिम्पिक कधी आणि कुठे होणार? जाणून घ्या संपूर्ण माहिती एका क्लिकवर
पाकिस्तानात होणार नाही चॅम्पियन्स ट्राॅफी? दिग्गज खेळाडूनं सांगितलं मोठं कारण
बाॅर्डर-गावसकर ट्राॅफी कोण जिंकेल भारत की ऑस्ट्रेलिया? दिग्गज खेळाडूनं केली मोठी भविष्यवाणी