---Advertisement---

विजयानंतरचा जल्लोष! आरसीबीला पराभूत केल्यानंतर केकेआरच्या ड्रेसिंग रुममध्ये खेळाडूंची मस्ती, पाहा व्हिडिओ

---Advertisement---

सोमवारी (२० सप्टेंबर) रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुध्द कोलकाता नाईट रायडर्स या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पाहायला मिळाला. आयपीएल २०२१ स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यातील कामगिरी पाहता रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला या सामन्यात विजयाचे प्रबळ दावेदार मानले जात होते. परंतु, कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाजांनी अप्रतिम कामगिरी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता. हा सामना कोलकाता नाईट रायडर्स संघाने ६० चेंडू आणि ९ गडी राखून आपल्या नावावर केला. या एकहाती विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघातील खेळाडूंनी ड्रेसिंग रूममध्ये जोरदार सेलिब्रेशन केले ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संघातील गोलंदाज वरूण चक्रवर्ती आणि आंद्रे रसलने अप्रतिम गोलंदाजी करत रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना पूर्णपणे बॅकफूटवर ठेवले होते. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश आले होते.त्यानंतर धावांचा पाठलाग करताना शुबमन गिल आणि वेंकटेश अय्यर यांनी मिळून कोलकाता नाईट रायडर्स संघाला एकहाती सामना जिंकून दिला होता.

विजय मोठा होता तर जल्लोष देखील जोरदार साजरा करण्यात आला होता. कोलकाता नाईट रायडर्स संघाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये एक खास बातचीत पाहायला मिळाली आहे. तर युवा वेंकटेश अय्यर हा हरभजन सिंगला मिठी मारताना दिसून येणार आहे. अय्यरच्या खेळीचे कौतुक करत हरभजन सिंगने देखील त्याची पाठ थोपटली. अय्यरने आपल्या खेळीबाबत बोलताना म्हटले की,”समोर गिलने अप्रतिम खेळी केली ज्यामुळे मला मोठे फटके खेळण्यासाठी आत्मविश्वास मिळाला.”

तसेच या व्हिडिओमध्ये कोलकाता नाईट रायडर्स संघाचा मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्क्यूलम चांगली कामगिरी करणाऱ्या वरूण चक्रवर्ती, आंद्रे रसल, शुबमन गिल आणि वेंकटेश अय्यरचे कौतुक करताना दिसून येत आहे. तसेच हरभजन सिंग आणि आंद्रे रसल हे दोघेही खास गप्पा मारताना दिसून येत आहे. या व्हिडिओवर चाहते देखील आपल्या प्रतिक्रीया देताना दिसून येत आहे.

https://www.instagram.com/tv/CUESYJMB70H/?utm_medium=copy_link

कोलकाता नाईट रायडर्स संघाचा दणदणीत विजय 
या सामन्यात विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील फलंदाजांना साजेशी कामगिरी करण्यात अपयश आले होते. ज्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचा संपूर्ण डाव अवघ्या ९२ धावांवर संपुष्टात आला होता.

या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या कोलकाता नाईट रायडर्स संघातील सलामीवीर फलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली होती. त्यामुळे कोलकाता नाईट रायडर्स संघाने हा सामना ६० चेंडू आणि ९ गडी शिल्लक असतानाच आपल्या नावावर केला.

महत्त्वाच्या बातम्या – 

फॉर्मात असलेल्या राहुलची बॅट राजस्थानविरुद्ध ओकणार आग, ‘इतक्या’ धावा चोपत करेल मोठा विक्रम

हे काय? धावबाद झाल्याने संतप्त फलंदाजाने सहकाऱ्यालाच फेकून मारली बॅट, व्हिडिओची चर्चा

टी२० पदार्पणात हॅट्रिक घेणाऱ्या गोलंदाजाला बघावी लागेल वाट? राजस्थानविरुद्ध ‘असा’ असेल पंजाबचा संघ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---