आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने सैम्युअल स्केमिड समितीचा अहवालाच्या आधारे ऊत्तजक द्रव सेवन प्रकरणात रशियाला दोषी ठरवून, रशियाला 2018 च्या हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी होण्यास बंदी घातली.
तसेच या अहवालात पुढे असे म्हणले आहे की,रशियन सरकारने या प्रकाराकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून खेळाडूंना ऊत्तेजक द्रव सेवनास प्रोत्साहीत केल्याचे अनेक पुरावे समोर आले आहेत.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने रशियाचे क्रिडा मंत्री विटली म्युटको यांच्यावर ऑलिम्पिकच्या कोणत्याही प्रकारच्या सहभागावर अजीवन बंदी घातली आहे. तसेच रशियन ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष अलेक्जेंडर झुकोव्हो यांचे आतंराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे सदस्यत्व रद्द करण्यात आले आहे.
2014 मधे ब्राझील येथे झालेल्या फीफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत अनेक रशियन खेळाडूंचा ऊत्तेजक द्रव सेवनाच्या प्रकरणात सहभाग होता, अशी माहिती वाडा(WADA)चे प्रवक्ते ग्रोगोरी रेडचेकोव्ह यांनी पत्रकार परिषदेत दिली.
आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने जरी रशियन आँलंपिक समितीे निलंबित केली असती तरी, जे रशियन खेळाडूं ऊत्तेजक द्रव चाचणीत निर्दोष आहेत त्यांना ऑलिम्पिक ध्वजाखाली स्वतंत्रपणे सहभागी होण्यास परवानगी दिली आहे.