भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर ऋतुराज गायकवाड याचे आयपीएलमधील प्रदर्शन कौतुकास्पद राहिले आहे. तो आयपीएल २०२१ मध्ये सर्वाधिक धावा कुटत ऑरेंज कॅपचा मानकरी राहिला होता. परंतु आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये त्याचे प्रदर्शन म्हणावे तसे राहिलेले नाही. परंतु मंगळवारी (१४ जून) दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तिसऱ्या टी२० सामन्यात पहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक ठोकत त्याने स्वतला सिद्ध केले आहे. यानंतर आता त्याने दबावातही आलेल्या आपल्या खेळीमागील रहस्य सांगितले आहे.
२५ वर्षीय ऋतुराजने २०२१ मध्ये श्रीलंकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. परंतु भारतीय संघासाठी खेळताना त्याचे प्रदर्शन जास्त चांगले राहिलेले नाही. तो ६ टी२० सामन्यांमध्ये ३७.७२च्या सरासरीने फक्त १२० धावा केल्या आहेत. यातही ५ सामन्यांनंतर त्याच्या बॅटमधून पहिलेवहिले आंतरराष्ट्रीय अर्धशतक निघाले आहेत. दुसरीकडे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तुलनेत आयपीएलमध्ये त्याचे प्रदर्शन खूप चांगले राहिले आहे. त्याने २०२० पासून ३६ आयपीएल सामने खेळताना १० अर्धशतके आणि एका शतकाच्या मदतीने १२०७ धावा केल्या आहेत.
अशात आयपीएलमधील चांगल्या प्रदर्शनानंतरही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली धमक न दाखवू शकल्याने ऋतुराजला टिकेचा सामना करावा लागत असे. परंतु ऋतुराज या गोष्टीची कसलीही चिंता करत नाही आणि आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवत असल्याचे त्याने सांगितले आहे. तसेच बाद होणे हा खेळाचा भाग असतो, त्यामुळे मी तो या गोष्टीमुळे चिंतीत नसल्याचेही त्याने म्हटला आहे.
ऋतुराज म्हणाला की, “आयपीएलमध्ये खेळपट्टींकडून गोलंदाजांना थोडी मदत मिळत होती. कोणतीही खेळपट्टी सपाट नव्हती. गोलंदाजांना स्विंग मिळत होता, चेंडू स्पिन होत होता आणि बऱ्याचदा तर चेंडू थांबून बॅटवर येत होता. याचमुळे सुरुवातीच्या ३-४ सामन्यात मी काही चांगल्या चेंडूंवर बाद झालो होतो. काही शॉट मारल्यानंतर चेंडू थेट क्षेत्ररक्षकाच्या हातात जात होता. परंतु हे सर्व टी२० क्रिकेटचा भाग आहे. काही वेळा खेळाडू खराब काळातून जात असतो किंवा त्याचे दिवस चांगले चालू नसतात. अशात तुम्हाला मानसिक रूपाने स्थिर राहावे लागते आणि त्या प्रक्रियेवर विश्वास ठेवावा लागतो.”
फॉर्मात नसलेल्या रोहित-विराटचं पुढे काय होणार, टी२० विश्वचषकातून डच्चू मिळेल का?
इंग्लंड दौऱ्यासाठी भारत तयार, कर्णधार रोहित, कोहली, बुमराहसह ‘हे’ खेळाडू मुंबईत; कधी पकडणार फ्लाईट?
इंग्लंड दौऱ्यासाठी ‘या’ महत्त्वाच्या खेळाडूच्या उपस्थितीवरच प्रश्नचिन्ह, दुखापत ठरलीय कारण