चेन्नई सुपर किंग्स संघाने सोमवारी (दि. 3 एप्रिल) आयपीएल 2023 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाला 12 धावांनी पराभूत केले. तसेच, हंगामातील पहिला विजय नावावर केला. लखनऊ संघाविरुद्धच्या सामन्यात चेन्नईच्या विजयाचे हिरो ऋतुराज गायकवाड आणि मोईन अली ठरले. ऋतुराजने वादळी 31 चेंडूत 57 धावा केल्या. त्यात 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश होता. त्याचवेळी त्यांनी या सामन्यानंतर बोलताना आपण केवळ संघाच्या विजयाचा विचार करत असल्याचे म्हटले.
मागील हंगामात फारशी चमक न दाखवू शकलेला ऋतुराज या हंगामात मात्र पहिल्या दोन सामन्यात गोलंदाजांवर चांगलाच तुटून पडला आहे. गुजरातविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात त्याने 92 धावांची खेळी केली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यातही त्याने आपला तोच फॉर्म कायम राखत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली. असे असताना त्याला सामन्यानंतर त्याची प्रतिक्रिया विचारली गेली. यावर उत्तर देताना तो म्हणाला,
“प्रामाणिकपणे सांगायचे झाल्यास फॉर्म चांगला आहे. मात्र, केवळ ऑरेंज कॅपचा विचार अजिबात डोक्यात नाही. मागील वर्षी संघ आणि मी अपेक्षित कामगिरी करू शकलो नव्हतो. यावेळी ही कसर भरून काढत संघाच्या विजयात अधिकाधिक योगदान देण्याचा प्रयत्न राहील.”
गुजरातने चेन्नईला पहिल्या सामन्यात पराभूत केले होते. मात्र, चार वर्षानंतर आपल्या घरच्या मैदानावर खेळत असलेल्या चेन्नईने दुसऱ्या सामन्यात लखनऊला एकतर्फी दिली. चेन्नईने ऋतुराज, कॉनवे, रायुडू, दुबे व धोनी यांच्या फलंदाजीच्या जोरावर 217 धावा उभ्या केल्या होत्या. त्याला उत्तर देताना मोईन अली याच्या गोलंदाजी पुढे लखनऊच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. चेन्नईने 12 धावांनी विजय मिळवत स्पर्धेतील आपले पहिले गुण कमावले.
(Ruturaj Gaikwad Said Am Not Thinking About Orange Cap I Want Given Contribution In Team Win)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीने सामनाच नाही, तर मनेही जिंकली; विजयानंतर ‘माही’चा अन् गौतमच्या मुलीचा प्रेमळ फोटो तुफान व्हायरल
रश्मिकाला नाचताना पाहून स्वत:ला रोखू शकले नाहीत गावसकर, लावले जोरदार ठुमके; पाहा व्हिडिओ