आयपीएल २०२१ संपले आहे. चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्सला हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. आयपीएलच्या या हंगामात अनेक खेळाडूंनी आपल्या कामगिरीने प्रभावित केले आहे. दरम्यान, या हंगामातून भारतासाठी भविष्याच्या दृष्टीने ३ मोठे खेळाडू मिळाले आहेत. यातील एक खेळाडू अष्टपैलू हार्दिक पांड्याला पर्याय म्हणून मानला जात आहे.
आयपीएल २०२१ मधील अनेक युवा भारतीय खेळाडूंनी आपली चमक दाखवली आणि हे भारतीय क्रिकेटसाठी एक चांगले चिन्ह मानले जात आहे. त्या तीन खेळाडूंविषयी आपण सविस्तर माहिती घेणार आहोत ज्यांना भारताचे भविष्य मानले जात आहे.
१. ऋतुराज गायकवाड:
चेन्नई सुपर किंग्सचा स्टार खेळाडू म्हणून उदयास आलेला ऋतुराज गायकवाडने आयपीएल २०२१ च्या या हंगामात सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. त्याने एकूण ६३५ धावा केल्या आहेत. २४ वर्षीय ऋतुराजने एकाच हंगामात ऑरेंज कॅप आणि उदयोन्मुख खेळाडू पुरस्कार जिंकणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. ऋतुराजने एकट्याने चेन्नई सुपर किंग्जच्या २५ टक्के धावा केल्या आहेत.
२. व्यंकटेश अय्यर:
अष्टपैलू व्यंकटेश अय्यरवर सध्या सर्वांच्या नजरा आहेत. आयपीएलच्या या मोसमात त्याने ज्याप्रकारे कामगिरी केली, त्यानंतर त्याला हार्दिक पंड्याचा पर्याय म्हणून मानले जात आहे. आपल्या फिटनेसमुळे, पांड्या बऱ्याच काळापासून गोलंदाजी करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत अय्यरसाठी ही खूप मोठी संधी असू शकते. कोलकाता नाईट रायडर्ससाठी आयपीएल २०२१ च्या दुसऱ्या टप्प्यात अय्यरने सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्याने १० सामन्यांमध्ये ३७० धावा केल्या आणि ४ डावांमध्ये ३ महत्त्वपूर्ण विकेट्सही घेतल्या.
३. हर्षल पटेल:
आयपीएल २०२१ मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरच्या हर्षल पटेलने पर्पल कॅप जिंकली. त्याने या मोसमात एकूण ३२ विकेट्स घेतल्या आहेत. ज्यात हॅटट्रिक ही नोंदवली होती. याशिवाय त्याने एका सामन्यात ४ विकेट्स, तर एका सामन्यात ५ विकेट्स घेतल्या होत्या. डेथ ओव्हर्समध्ये हर्षल सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला होता. डेथ ओव्हर्समध्ये त्याने एकूण २१ विकेट्स घेतल्या होत्या.
महत्त्वाच्या बातम्या –
अश्विनच्या टी२० विश्वचषकासाठीच्या निवडीवर कर्णधार विराट कोहलीने सोडले मौन; म्हणाला…
रिकी पाँटिंगने धूडकावली भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदाची ऑफर?
Photo: धोनीची टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियान एन्ट्री! बीसीसीआयने ‘किंग’ म्हणत केले ‘ग्रँड वेलकम’