दक्षिण आफ्रिका येथे सुरू असलेल्या महिला अंडर 19 टी20 विश्वचषक स्पर्धेत रविवारी (22 जानेवारी) सुपर सिक्स फेरीत वेस्ट इंडिज विरूद्ध रवांडा असा सामना खेळला गेला. या सामन्यात नवख्या रवांडाने मोठा उलटफेर करताना वेस्ट इंडीज संघाला 4 गडी राखून पराभूत केले. रवांडाने यापूर्वी पहिल्या फेरीत झिम्बाब्वेला पराभूत करण्याचा कारनामा केला होता.
What a win! 🤯
Rwanda topple the West Indies 🤩
Watch the Women's #U19T20WorldCup for FREE on https://t.co/CPDKNxoJ9v (in select regions) 📺
📝 https://t.co/b2qCbfrjIX pic.twitter.com/8OFRZzWo0c
— ICC (@ICC) January 22, 2023
पोचेस्ट्रम येथे खेळल्या गेलेल्या सामन्यात वेस्ट इंडीज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मात्र, त्यांचा हा निर्णय उलटा पडला. सिल्विया युसाबयिमाना व मेरी टुमुमकुंडे या दोन्ही गोलंदाजांनी वेस्ट इंडीजचा डाव अक्षरशः गुंडाळला. दोघींनी प्रत्येकी चार बळी आपल्या नावे केले. वेस्ट इंडीजसाठी सलामीवीर रिलीयाना ग्रिमंड वगळता कोणीही दुहेरी धावसंख्या गाठू शकले नाही. त्यामुळे वेस्ट इंडीजचा डाव 70 धावांवर संपुष्टात आला.
या धावांचा पाठलाग करताना रवांडा संघाचा डावही गडगडला. 12 षटकात केवळ 40 धावांवर त्यांचे 6 बळी गेले. मात्र, कर्णधार जिझेल इशिम्वेने एक बाजू लावून धरत 53 चेंडूवर नाबाद 31 धावांची खेळी केली. तिने इरेनासह नाबाद 31 धावांची भागीदारी करत संघाला विजय मिळवून दिला.
कोणत्याही स्तरावरील पहिलीच विश्वचषक स्पर्धा खेळत असलेल्या रवांडाची ही कामगिरी नक्कीच विश्वास देणारी आहे. मात्र, या कामगिरीनंतर देखील त्यांची उपांत्य फेरीत जाण्याची संधी हुकू शकते.
(Rwanda Womens Beat West Indies In Womens U19 T20 World Cup)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
अर्शदीपच्या ‘नो-बॉल’ समस्येवर ऑस्ट्रेलियन दिग्गजाने सुचविला उपाय, म्हणाला, “त्याने 100 टक्के”
इंदोर वनडे टीम इंडियासाठीच बनलाय ‘डू ऑर डाय’! तब्बल 4 वर्षांनी आलाय हा मौका