---Advertisement---

कुलदीपच्या विरोधात तब्बल १० वर्षांनंतर खेळतोय झिम्बाब्वेचा स्टार खेळाडू, याआधी ‘या’ सामन्यात आले होते आमने-सामने

On: रविवार, ऑगस्ट 21, 2022 6:07 PM
Ryan-burl-Kuldeep-Yadav
---Advertisement---

केएल राहुलच्या नेतृत्वाखाली भारताने झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेत चमकदार कामगिरी केली. टीम इंडियाने पहिला सामना १० गडी राखून आणि दुसरा सामना ५ विकेटने जिंकला. भारताच्या दुसऱ्या सामन्यात कुलदीप यादवने विकेट घेतली. या सामन्यात रायन बर्ल झिम्बाब्वेकडून खेळला होता. त्याने सामन्यानंतर कुलदीपसोबतचा एक मनोरंजक फोटो शेअर केला आहे. रायनने सांगितले की, तो कुलदीपसोबत १० वर्षांनंतर खेळत आहे.

झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू रायन बुर्ले आणि कुलदीप यादव १९ वर्षाखालील विश्वचषकात एकमेकांविरुद्ध खेळले. आता १० वर्षांनंतर ते दोघे पुन्हा समोरासमोर आले आहेत. रायनने ट्विटरवर त्याची आठवण करून एक फोटो शेअर केला आहे. त्याने लिहिले, “मी शेवटच्या वेळी या व्यक्तीविरुद्ध १० वर्षांपूर्वी १९ वर्षांखालील विश्वचषकाध्ये खेळलो होतो! पुन्हा भेटून आनंद झाला.”

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

‘आता तरी त्यांना संधी द्या’; विश्वविजेत्या फलंदाजाची टीम मॅनेजमेंटकडे मागणी

कसोटीतील भारताचा ‘अजिंक्य’ कर्णधार पुनरागमनासाठी सज्ज! ‘या’ दिवशी उतरणार मैदानात

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---