राजस्थान रॉयल्स संघाचा अष्टपैलू रियान पराग आयपीएल 2023 हंगामासाठी उत्सुक दिसत आहे. परागसाठी मागच्या देशांतर्गत हंगाम जबरदस्त राहिला. आगामी आयपीएल हंगामाद देखील त्याला अशाच पद्धचीचे प्रदर्शन कायम ठेवायचे आहे. त्याने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये परागने आगामी आयपीएल हंगामाविषयी स्वतःचाच एक अंदाज वर्तवला आहे.
रियान पराय (Ryan Parag) याने रणजी ट्रॉफी हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजी या दोन्ही विभागांमध्ये प्रभावित केले. याच पार्श्वभूमीवर आगामी आयपीएल हंगामात देखील त्याला चांगल्या प्रदर्शनाची अपेक्षा आहे. आयपीएल 2023 (IPL 2023) साठी अवघ्या काही दिवसांचा वेळ बाकी असताना राजस्थानचा हा अष्टपैलू मात्र खूपच उत्साहात आहे. पराने आपल्या ट्वीटर खात्यावरून ट्वीट केले की, “माझा अंतरआत्मा सांगत आहे की, मी आगामी आयपीएलमध्ये एका प्वॉइंटला षटकात चार षटकार मारत आहे.”
दरम्यान, गुवाहाटी प्रीमियर लीग रियानेने नुकतीच गाजवली. त्याने या लीग स्पर्धेतील 12 सामने सामन्यांमध्ये 683 धावा कुटल्या. गोलंदाजी विभागात रियानने या 12 सामन्यात 27 विकेट्स घेतल्या. या लीगमध्ये रियान अंतिम सामन्यात सामनावीर, मालिकावीर, सर्वोत्तम फलंदाज, सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज या पुरस्कारांचा मानकरी ठरला. अशात आयपीएल 2023 मध्ये त्याच्या प्रदर्शनावर चाहत्यांची नजर असेल. राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) संघाला आगामी हंगामातील त्यांचा पहिला सामना 2 एप्रिल रोजी खेळायचा आहे. सनरायझर्स हैदराबादचे आव्हान या सामन्यात राजस्थानपुढे असेल.
रियानच्या आयपीएल कारकिर्दीचा विचार केला, तर त्याने या लीगमध्ये 47 सामन्यांमध्ये 522 धावा केल्या आहेत. यादरम्यान गोलंदाजाच्या रूपात त्याने अवघ्या 4 विकेट्स घेतल्या आहेत.
(Ryan Parag made a big prediction about the upcoming IPL season)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
‘तू मला लय वाट पाहायला लावलीस…’, मुलाखतीत कोच द्रविड विराटला असे का म्हणाले? पाहा व्हिडिओ
भारतीय कसोटी क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध भीमपराक्रम