चेम्सफोर्ड | भारत आणि एसेक्स कौंटी संघ यांच्यात बुधवार पासून (२५ जुलै) कौंटी क्रिकेट मैदान चेम्सफोर्ड येथे तीन दिवसीय सराव सामन्याला सुरवात झाली आहे.
या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचा अनुभवी गोलंदाज आर अश्विन नेटमध्ये सराव करताना जखमी झाला आहे.
सरावावेळी अश्विनच्या उजव्या हाताला दुखापत झाल्याने, त्याने या सराव सामन्याच्या दुसऱ्या दिवशी फलंदाजी आणि गोलंदाजीसाठी मैदानात न उतरण्याचा निर्णय घेतला होता.
भारतीय संघ व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार अश्विनची दुखापत किरकोळ आहे. दोन ते तीन दिवसात अश्विन फिट होईल असे संघ व्यवस्थापनाने सांगितले.
भारत-इंग्लंड यांच्यात होणऱ्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना,१ ऑगस्ट रोजी होणार.
इंग्लंडमधील वातावरण पाहता इथे भारतीय फिरकी गोलंदाज महत्त्वाची भुमिका निभावणार आहेत.
त्यामुळे भारतीय संघाच्या कामगिरीत आर अश्विनला महत्त्वाची भूमिका निभावावी लागणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
-कोणतेही डोके न वापरता वेळापत्रक बनवलं आहे, आशिया चषकाच्या तारखा बदला
-टाॅप ५- इम्रान खानबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?