---Advertisement---

टाॅप ५- इम्रान खानबद्दल या ५ गोष्टी तुम्हाला माहित आहेत का?

On: गुरूवार, जुलै 26, 2018 6:26 PM
---Advertisement---

बुधवारी (२५ जुलै) पार पडलेल्या पाकिस्तानच्या सार्वजनिक निवडणुकचे निकाल गुरुवारी जाहीर झाले आहेत. त्यामुळे आता पाकिस्तानला 19 वा पंतप्रधान मिळाला आहे.पाकिस्तानचा नवा पंतप्रधान म्हणून माजी क्रिकेटपटू इम्रान खानचे नाव जाहीर झाले आहे.

1992 मध्ये पाकिस्तानला प्रथमच विश्वविजेतेपद मिळवून देणाऱ्या इम्रान खान यांनी 3 जून 1971 ला इंग्लंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

ते पाकिस्तानकडून कसोटी क्रिकेट खेळणारे फक्त 65 वे खेळाडू ठरले होते. यांनंतर त्यांच्यावर पाकिस्तान संघाच्या नेतृत्वाची धूराही सोपवण्यात आली. त्यामुळे ते 1982 मध्ये पाकिस्तानचे 13 वे कसोटी कर्णधार बनले.

यानंतर त्यांनी पाकिस्तानला अनेक विजयही मिळवून दिले. त्यांनी आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 88 कसोटी सामन्यात 362 विकेट्स तर 175 वनडे सामन्यात 182 विकेट्स मिळवल्या.

1992 च्या विश्वचषकानंतर इम्रान खान यांनी क्रिकेटमधून निवृत्ती घेत राजकारणामध्ये पदार्पण केले. त्यांनी 1996ला पाकिस्तान तेहरीक-ए-इंन्साफ या रायकीय पक्षाची स्थापना केली.

त्यांचे खेळाडू आणि राजकारणी म्हणून जेवढी चर्चा झाली तेवढीच त्यांच्या वैयक्तीक आयुष्याबद्दलही झाली. त्यांनी तीन लग्न केल्याने त्यांना अनेकदा वादाला सामोरे जावे लागले आहे. पण आता त्यांनी पाकिस्तानचे 19 वे पंतप्रधान बनुन सर्वांची मने जिंकली आहेत. याबद्दल त्यांना सर्व स्तरातून शुभेच्छाही देण्यात येत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या:

विरेंद्र सेहवाग म्हणतो, भारताने आशिया चषक स्पर्धेत खेळूच नये

टीम इंडियाच्या मदतीला धावला ‘मिस्टर क्रिकेट’ माइक हसी, दिला हा मोलाचा सल्ला

तो एक स्वार्थी, गर्विष्ठ आणि हुकूमशहा आहे, आम्हाला तो कर्णधार म्हणुन नकोच

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment