२ विश्वचषक विजेत्या संघाचा भाग असणारा भारताचा वेगवान गोलंदाज एस श्रीसंतने भारतीय संघातील आपल्या पुनरागमनाबाबत मोठे विधान केले आहे. त्याने येत्या काळात त्याचा रोडमॅप कसा असेल याविषयी सांगितले आहे. शिवाय, त्याला २०२३ साली पुन्हा एकदा भारतीय संघासोबत विश्वचषक ट्रॉफी आपल्या हातात घ्यायची असल्याचेही त्याने सांगितले. S Shreesanth wants to win 2023 world cup with indian team.
स्पोर्ट्सकीडाच्या अधिकृत पेजवर अफरीन खान यांनी घेतलेल्या लाइव्ह सेशनमध्ये श्रीसंतने या गोष्टींचा उलगडा केला आहे. श्रीसंत म्हणाला की, “मी बऱ्याच वर्षांपासून माझ्या भारतीय संघातील पुनरागमनाची वाट पाहत आहे. मी वास्तवात राहण्याचा प्रयत्न करत होतो. पण, आता मी अवास्तव लक्ष्य निर्धारित करत आहे आणि ते पूर्णही होत आहेत.”
“त्यामुळे आता माझे पुढील अवास्तविक लक्ष्य हे आहे की, मी २०२३च्या विश्वचषकात खेळेन आणि भारतीय संघाला चषक जिंकून देईल. त्यानंतरच मला निवृत्ती घ्यायची आहे. मिस्बाह उल हक यांनी ४२व्या वर्षांपर्यंत क्रिकेट खेळले, सचिन तेंडुलकरनेही ४२ वर्षापर्यंत क्रिकेट खेळले. या यादीत राहुल द्रविडचेही नाव येते. त्यानेही ४२व्या वर्षांपर्यंत आयपीएल खेळले होते,” असे श्रीसंतने सांगितले.
श्रीसंत पुढे बोलताना म्हणाला की, “माझ्याकडे माझ्या पुनरागमनाचा रोडमॅपही आहे. परंतु, माझे बॅट आणि चेंडूसोबतचे प्रदर्शन माझा पुढील मार्ग ठरवेल.”
श्रीसंतने ऑक्टोबर २००५ला वनडेतून आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीची सुरुवात केली होती. तो २००७ आणि २०११सालच्या विश्वचषक विजेत्या संघाचा भाग होता. तो आयपीएलच्या किंग्स इलेव्हन पंजाब, कोची टस्कर्स केरळा आणि राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता.
मात्र, स्पॉट फिक्सिंग प्रकरणामुळे त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. पण ७ वर्षांनंतर त्याच्यावरील बंदी उठवण्यात आली. येत्या ऑगस्ट महिन्यात त्याच्यावरील प्रतिबंध संपतील. त्यामुळे सप्टेंबरमध्ये श्रीसंत पुनरागमन केल्यानंतर कशा प्रकारे खेळेल हे पाहणे रोमांचक ठरेल.
ट्रेंडिंग घडामोडी-
विश्वविजेत्या कर्णधाराने बदलली रखवालदाराच्या मुलाची जिंदगी, आज मोदीही घेतात नाव
ज्या स्टेडियमवर धोनीच्या षटकाराने इंडियाला मिळवुन दिला विश्वचषक ते…
या कंपनीने दिला होता सचिनला धोका, आता मागावी लागली थेट माफी