इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) चौदाव्या हंगामाची तयारी जोर धरत आहे. १८ फेब्रुवारी रोजी चेन्नईमध्ये होणाऱ्या लिलावासाठी गुरुवारी (११ फेब्रुवारी) आयपीएलने शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे. या हंगामातून आयपीएलमध्ये पुनरागमन होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या एस श्रीसंत याच्या पदरी मात्र निराशा आली आहे. कारण आयपीएलच्या शॉर्टलिस्ट खेळाडूंमध्ये त्यांच्या नावाचा समावेश झालेला नाही.
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी एकूण १११४ खेळाडूंचे आपल्या नावाची नोंदणी केली होती. त्यापैकी केवळ २९२ खेळाडूंची नावे शॉर्टलिस्ट करण्यात आली आहेत. या सर्व खेळाडूंची यादी आयपीएलच्या सहभागी ८ संघांना पाठवण्यात आली आहे.
हरभजन, केदारची कमीत-कमी किंमत २ कोटी
आयपीएल २०२१ च्या लिलावामध्ये २ कोटी मुळ किंमत असणाऱ्या खेळाडूंच्या रांगेत एकूण १० नावांचा समावेश आहे. यामध्ये हरभजन सिंग आणि केदार जाधव या २ भारतीयांचा समावेश आहे. तर उर्वरित ८ परदेशी खेळाडू असून ग्लेन मॅक्सवेल, स्टिव्ह स्मिथ, शाकिब अल हसन, मोईन अली, सॅम बिलिंग्स, लियाम प्लंकेट, जेसन रॉय आणि मार्क वुड अशी त्यांची नावे आहेत.
कोणत्या मुळ किंमतीला किती खेळाडू?
या लिलावात एकूण १२ खेळाडू असे आहेत, ज्यांची मुळ किंमत १.५ कोटी असेल. तर १ कोटी मुळ किंमत असणारे एकूण ११ खेळाडू असतील. यामध्ये हनुमा विहारी आणि उमेश यादव या भारतीयांचा समावेश आहे. त्याहून कमी किंमतीत अर्थात ७५ लाख रुपयांपासून १५ खेळाडूंची बोली सुरू होईल. तर तब्बल ६५ खेळाडूंची मुळ किंमत ५० लाख असेल. या ६५ खेळाडूंमध्ये १३ भारतीय तर ५२ परदेशी खेळाडू असतील.
२९२ शॉर्टलिस्ट खेळाडूंमध्ये १६४ भारतीय
आयपीएल २०२१ च्या लिलावासाठी शॉर्टलिस्ट करण्यात आलेल्या एकूण २९२ खेळाडूंमध्ये १६४ भारतीय आणि १२५ परदेशी खेळाडू आहेत. उर्वरित ३ खेळाडू हे असोसिएट देशांचे असतील.
श्रीसंतची आयपीएल कारकिर्द
वेगवान गोलंदाज श्रीसंतने आयपीएल २००८ मध्ये किंग्स इलेव्हन पंजाबकडून कारकिर्दीची सुरुवात केली होती. पुढील ५ वर्षात त्याने कोची टस्कर्स केरळ आणि राजस्थान रॉयल्स संघाचे प्रतिनिधित्त्व केले. यादरम्यान त्याने ४४ सामने खेळताना ४० विकेट्स चटाकवल्या होत्या. तरीही २०१३ पासून कोणत्याही संघाने त्याच्यासाठी बोली लावलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या-
बीसीसीआयचं मोठं पाऊल! चेन्नई कसोटीतील टीम इंडियाच्या दारुण पराभवानंतर पिच क्यूरेटरची सुट्टी
ये दीवार टूटती क्यों नहीं है भाई? कोहलीनंतर पुजारा होता कमिन्सच्या निशाण्यावर, आता स्वत:च केलं कौतुक
परदेशात हिरो अन् मायदेशात झिरो! भारतात रहाणेची फलंदाजी सरासरी चक्क पुजारापेक्षाही कमी