बीसीसीआयने रणजी ट्रॉफीचा (ranji trophy) यावर्षीचा हंगाम दोन टप्प्यांमध्ये विभागण्याचा निर्णय घेतला आहे. पहिला टप्पा १७ फेब्रुवारी सुरू होणार आहे. याच पार्श्वभूमीवर मंगळवारी केरळ संघाची घोषणा केली गेली आहे. मागच्या मोठ्या काळापासून ज्याच्यावर क्रिकेट खेळण्यासाठी बंदी घातली गेली होती, तो एस श्रीसंत (s sreesanth) आता रणजी ट्रॉफीत पुनरागम करणार आहे. केरळच्या रणजी संघात एस श्रीसंतलाही सामील केले गेले आहे.
१७ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या या स्पर्धेसाठी श्रीसंतला केरळच्या संघात स्थान मिळाले आहे. केरळ संघाला त्यांचा पहिला सामना हरियाणा संघाविरुद्ध खेळायचा आहे. केरळ संघ ग्रुप बी मध्ये सामील आहे. ज्यामध्ये त्यांच्यासमोर बंगाल, विदर्भ, राजस्थान, हरियाणा आणि त्रिपुरा या संघांचे आव्हान असणार आहे. हे सर्व सामने बेंगलोरमध्ये पार पडतील. पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे आयोजन मुंबई, बेंगलोर, कोलकाता, अहमदाबाद, त्रिवेंद्रम आणि चेन्नई या शहरांमध्ये केले जाईल.
श्रीसंत २०१३ आयपीएलदरम्यान स्पॉट फिक्सिंग प्रकारणात दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर क्रिकेट खेळण्याची बंदी घातली गेली. मागच्या मोठ्या काळापासून तो कोर्टात लढा देत होता. अखेर २०२० मध्ये त्याची या आरोपांमधून निर्दोष सुटका केली गेली. आता चाहतेही त्याला तब्बल ९ वर्षांपेक्षा अधिक काळानंतर पुन्हा एकदा लाल चेंडूच्या क्रिकेटमध्ये पाहण्यासाठी इच्छुक आहेत. आयपीएल २०२२ च्या मेगा लिलावात शॉर्टलिस्ट केल्या गेलेल्या ५९० खेळाडूंमध्येही एस श्रीसंतचे नाव आहे. अशात मेगा लिलावात त्याने स्वतःची बेस प्राइस ५० लाख रूपये ठेवली आहे. त्याच्यावर फ्रेंचायझींकडून बोली लागण्याची पूर्ण शक्यता आहे.
श्रीसंतने संघात पुनरागमन केले असले, तरी केरळ संघाचा महत्वाचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसन मात्र दुखापतीमुळे सध्या एनसीएमध्ये आहे. एकदा त्याने फिटनेस टेस्ट पास केली, की मग तो संघात पुनरागमन करण्यासाठी तयार असेल. अशात पहिल्या सामन्यात संजू सॅमसन खेळताना दिसणार नाहीये. श्रीसंतला केरळच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संधी मिळण्याचीही पूर्ण शक्यता आहे.
रणजी ट्रॉफीसाठी निवडला गेलेला केरळा संघ –
सचिन बेदी (कर्णधार), विष्णू विनोद (उपकर्णधार / यष्टीरक्षक), आनंद कृष्णन, रोहन कुन्नुमेल, वस्तल गोविंद, राहुल पी, सलमान निझार, जलाज सक्सेना, जोजी मोन जोसेफ, अक्षय केसी, एस मिथून, एनपी बासील, एमडी निदेश, मन्नू कृष्णन, बसली थम्पी, फानोस एफ, एस श्रीसंत, वरून नारायन (यष्टीरक्षक), विनूप मनोहरन, ईडन ऍप्लल टॉम.
महत्वाच्या बातम्या –
‘यंग इंडिया’ ते ‘टीम इंडिया’ प्रवास नाही सोपा! ‘इतक्या’ खेळाडूंच्या नशिबी आली निळी जर्सी
रोहितचा ‘तो’ सल्ला आला चहलच्या कामी; कर्णधाराला दिले यशाचे श्रेय
कारकीर्द वाचवण्यासाठी पुजाराने घेतला मोठा निर्णय! वाचा सविस्तर