---Advertisement---

SA T20 लिलाव: मार्की खेळाडूंत युवा जेन्सन ठरला महागडा; निशाम अनसोल्ड

On: सोमवार, सप्टेंबर 19, 2022 6:50 PM
marco-jansen
---Advertisement---

दक्षिण आफ्रिकेत नवीन वर्षात सुरू होणाऱ्या एसए टी20 लीगसाठी खेळाडूंचा लिलाव केपटाऊन येथे सुरू आहे. आयपीएलमधील सहा फ्रॅंचाईजींनी या स्पर्धेतील सहा ही संघ विकत घेतले आहेत. लिलावाच्या सुरुवातीला आठ मार्की खेळाडूंचा लिलाव झाला. यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा युवा अष्टपैलू मार्को जेन्सनने सर्वाधिक बोली मिळवत लिलावाची पहिली फेरी आपल्या नावे केली.

 

दक्षिण आफ्रिका क्रिकेटला या नव्या लीगपासून भरपूर अपेक्षा आहेत. त्याचाच भाग म्हणून आयपीएलच्या धर्तीवर त्यांनी खेळाडूंचा लिलाव आयोजित केला आहे. लिलावाच्या पहिल्या फेरीत आठ मार्की खेळाडूंवर बोली लागली. वेगवान गोलंदाज लुंगी एन्गिडी हा बोली लागलेला खेळाडू ठरला. त्याच्यावर पार्ल रॉयल्सने 3.4 मिलियन रॅंडची बोलू लागली. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या फिरकीपटू तबरेझ शम्सीलाही रॉयल्सने 3 मिलियन रॅंडमध्ये आपल्या संघात सामील करून घेतले. दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख फलंदाज रॅसी वॅन डर डसेन 3.9 मिलियन रॅंडसह एमआय केपटाऊनचा भाग झाला. यष्टीरक्षक हेन्रिक क्लासेन व अष्टपैलू ड्वेन प्रिटोरियस यांना डरबन सुपरजायंट्सने अनुक्रमे 4.5 मिलियन व 4.1 मिलियन रॅंडसह आपल्या संघात सामील करून घेतले.

आठ खेळाडूंमध्ये सर्वात शेवटी युवा अष्टपैलू मार्को जेन्सनचा क्रमांक आला. पार्ल, प्रिटोरिया व जोहान्सबर्ग यांना पाठी टाकत सनरायझर्स ईस्टर्न केपने सर्वाधिक 6.1 मिलियन रॅंडची बोली त्याच्यावर लावली. जेन्सन आयपीएलमध्ये देखील सनरायझर्स हैदराबाद संघासाठी खेळतो. मार्की खेळाडूंच्या यादीत असलेला वेस्ट इंडीजचा अष्टपैलू ओडेन स्मिथ व न्यूझीलंडचा अष्टपैलू जिमी निशाम यांना कोणीही खरेदीदार लाभला नाही.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
लज्जास्पद! फोटोसाठी राज्यपालांनी सुनील छेत्रीला केले बाजूला; भडकलेल्या चाहत्यांची धक्कादायक मागणी
कुस्तीपटू बजरंग पुनियाची कमाल, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला पहिलाच भारतीय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---