---Advertisement---

“आता आम्ही विश्वचषक जिंकणार”; ग्रॅमी स्मिथने केला शंखनाद

On: शनिवार, डिसेंबर 3, 2022 9:57 PM
South-Africa
---Advertisement---

पुढील वर्षाच्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेत नवी टी20 लीग सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका ‌‌‌‌‌‌‌टी20 लीग असे नामकरण करण्यात आलेल्या या लीगचा ‌‌लॉन्चिंग सोहळा नुकताच मुंबई येथे पार पडला. अतिशय दिमागदार झालेल्या या सोहळ्यात या स्पर्धेचा संचालक व दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथ याने एक मोठे वक्तव्य केले.

जानेवारी महिन्यात दक्षिण आफ्रिकेत ही लीग सुरू होत आहे. दक्षिण आफ्रिका क्रिकेटला या लीगपासून मोठ्या अपेक्षा आहेत. या लीगद्वारे दक्षिण आफ्रिका क्रिकेटमध्ये पैसा येऊ शकतो असा अंदाज वर्तवला जातोय. त्याचवेळी दक्षिण आफ्रिकेला काही उदयोन्मुख खेळाडू देखील या लीगमधून मिळू शकतात. या सर्व शक्यता असतानाच, संचालक असलेल्या स्मिथने एक मोठी प्रतिक्रिया दिली.

लीगच्या लॉन्चिंग वेळी बोलताना स्मिथने नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकातील दक्षिण आफ्रिका संघाच्या कामगिरीविषयी आपली प्रतिक्रिया दिली. तो म्हणाला,

“या विश्वचषकात दक्षिण आफ्रिका संघ नक्कीच मजबूत होता. मलादेखील संघाकडून मोठी अपेक्षा होती मात्र त्यांनी निराश केले. आता मला वाटते या लीगने दक्षिण आफ्रिका क्रिकेटला नक्कीच फायदा होईल. मला आशा आहे की आपली प्रतिभा जगाला नक्कीच दिसेल. यातून आम्हाला विश्वचषक जिंकण्याची प्रेरणा मिळू शकते.”

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील एक मजबूत संघ असलेल्या दक्षिण आफ्रिकेला अद्याप कोणताही विश्वचषक जिंकता आला नाही. मोक्याच्या सामन्यात हा संघ नेहमीच पराभूत होताना दिसतो.

दक्षिण आफ्रिका टी20 लीगमध्ये सहा संघ सहभागी होत आहेत. विशेष म्हणजे हे सर्व संघ आयपीएलमधील फ्रॅंचायजीने विकत घेतले आहेत. आयपीएलप्रमाणे खेळाडूंचा लिलाव होणारी ही केवळ दुसरी लीग आहे. लीगची सुरुवात 10 जानेवारी रोजी होऊन अंतिम सामना ‌‌‌‌11 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल.

(SA T20 League Will Help Us To Win World Cup Greame Smith Said)

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
इंग्लंड विरुद्ध शतक ठोकताच बाबर आझमने केला विक्रम, कोहली- रोहित आसपासही नाही
जमशेदपूर एफसीला विजय आवश्यक; रविवारी त्यांच्यासमोर केरळा ब्लास्टर्सचे आव्हान 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---