आयसीसीच्या वनडे क्रमवारीत अव्वलस्थानी असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला शुक्रवारी (दि. 15 सप्टेंबर) मोठ्या पराभवाचा धक्का सहन करावा लागला. खरं तर, ऑस्ट्रेलिया संघ सध्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आहे. उभय संघात 5 सामन्यांची वनडे मालिका खेळली जात आहे. यातील चौथ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाहुण्या ऑस्ट्रेलियाला 164 धावांच्या फरकाने पराभवाचा धक्का दिला. तसेच, मालिकेत 2-2ने बरोबरी साधली. या सामन्यातील अफलातून कामगिरीसाठी यजमान संघाचा फलंदाज हेन्रीच क्लासेन याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, क्लासेनने एक खास विक्रमही आपल्या नावावर केला.
क्लासेनचा ‘क्लास’ पराक्रम
दक्षिण आफ्रिका विरुद्ध ऑस्ट्रेलिया (South Africa vs Australia) संघातील तिसऱ्या वनडेत हेन्रीच क्लासेन (Heinrich Klaasen) शून्यावर तंबूत परतला होता. मात्र, चौथ्या वनडेत त्याने कहरच केला. त्याने ज्याप्रकारे फलंदाजी केली, ते पाहून असे म्हटले जात होते की, तो पूर्ण तयारीनिशी मैदानावर उतरला होता. तसेच, त्याने आक्रमक फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची चांगलीच धुलाई केली. क्सासेनने या सामन्यात 83 चेंडूंचा सामना करत सर्वाधिक 174 धावांची झंझावाती दीडशतकी खेळी साकारली. यासह तो दक्षिण आफ्रिकेकडून वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या यादीतही सामील झाला.
क्लासेनचे वेगवान शतक (Heinrich Klassen Hundred)
सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दक्षिण आफ्रिकेने शानदार सुरुवात केली होती. क्विंटन डी कॉक आणि हेन्रीच क्लासेन यांनी संघाला शानदार सुरुवात दिली. यानंतर रासी व्हॅन डर डुसेन याने 62 धावांची खेळी साकारली. तसेच, सामन्यात क्लासेनने 83 चेंडूत 174 धावा चोपल्या. त्याने या धावा करताना 13 चौकार आणि 13 षटकारांचाही पाऊस पाडला. यादरम्यान त्याचा स्ट्राईक रेट 209हून अधिक होता. विशेष म्हणजे, क्लासेन डावाच्या शेवटच्या चेंडूवर बाद झाला. क्लासेनने सुरुवातीच्या 25 चेंडूत 24 धावा केल्या होत्या. मात्र, नंतरच्या 58 चेंडूत थेट 150 धावा चोपल्या.
यादरम्यान क्लासेनने दक्षिण आफ्रिकेसाठी वनडेत सर्वात वेगवान शतक ठोकणाऱ्या फलंदाजांच्या क्लबमध्ये एन्ट्री केली. त्याने 57 चेंडूत शतक झळकावले. वनडेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वात वेगवान शतक करण्याचा विक्रम एबी डिविलियर्स (AB De Villiers) याच्या नावावर आहे. त्याने 31 चेंडूत 2015मध्ये हा कारनामा केला होता. या यादीत क्लासेन चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे. तसेच, यादीत डिविलियर्सचे नाव सर्वाधिक 7 वेळा आहे.
दक्षिण आफ्रिकेसाठी सर्वात वेगवान वनडे शतक करणारे फलंदाज
31 चेंडू- एबी डिविलियर्स, 2015
44 चेंडू- मार्क बाऊचर, 2006
52 चेंडू – एबी डिविलियर्स, 2015
54 चेंडू – हेन्रीच क्लासेन, 2023
57 चेंडू – हेन्रीच क्लासेन, 2023*
57 चेंडू – एबी डिविलियर्स, 2015
57 चेंडू – एबी डिविलियर्स, 2015
58 चेंडू – एबी डिविलियर्स, 2010
66 चेंडू – एबी डिविलियर्स, 2014
68 चेंडू – एबी डिविलियर्स, 2017 (sa vs aus fabulous heinrich klassen hit fastest odi hundred for south africa against australia in 4th odi match read)
हेही वाचा-
दक्षिण आफ्रिकेचा कहर! ऑस्ट्रेलियाविरुद्ध बनवला World Record, वनडेतील अखेरच्या 10 षटकात चोपल्या ‘एवढ्या’ धावा
शून्यावर बाद होणारा कर्णधार रोहित पराभवानंतर स्पष्टच बोलला; म्हणाला, ‘बांगलादेशच्या गोलंदाजांना…’






