सीएसकेच्या माजी शिलेदाराकडे मोठी जबाबदारी! बांगलादेशी फलंदानांना शिकवणार कशी करायची ‘पॉवर हिटिंग’

सीएसकेच्या माजी शिलेदाराकडे मोठी जबाबदारी! बांगलादेशी फलंदानांना शिकवणार कशी करायची पॉवर हिटिंग

चेन्नई सुपर किंग्स संघासाठी अष्टपैलूची भूमिका पार पाडलेल्या एल्बी मॉर्कलवर बांगलादेश क्रिकेट बोर्डने मोठी जबाबदारी सोपवणार आहे. मॉर्कलला बांगलादेशी फलंदाजांना पॉवर हिटिंगचे प्रशिक्षण द्यायचे आहे. सध्या झटपट क्रिकेटची मागणी वाढत आहे आणि बांगलादेशी संघ या स्पर्धेत मागे राहू इच्छित नाही. दक्षिण अफ्रिका आणि बांगलादेश यांच्यातील आगामी मालिकेदरम्यान मॉर्कल बांगलादेश संघाचा पॉवर-हिटर प्रशिक्षक असणार आहे.

दक्षिण अफ्रिका आणि बांगालदेश यांचात १८ मार्चपासून तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळली जाणार आहे, जी २३ मार्चला संपेल. त्यानंतर उभय संघात दोन सामन्यांची कसोटी मालिकाही खेळली जाणार आहे.

एकदिवसीय मालिकेदरम्यान एल्बी मॉर्कल (Albie Morkel) बांगलादेश संघाचा पॉवर-हिटिंग प्रशिक्षक (Power Hitting Coach) असणार आहे. ईएसपीएन क्रिकइंफोच्या माहितीनुसार मंगळवारी (१५ मार्च) सांगितले गेले की, मॉर्कल जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमच्या दौऱ्यावर आलेल्या बांगलादेश संघाशी जोडला गेला होता. या मैदानावर बांगलादेश संघ सराव सामने खेळत आहे.

वृत्तानुसार, मागच्या वर्षी यूएई आणि ओमानमध्ये बांगलादेश संघाने निराशाजनक प्रदर्शन केल्यामुळे बांगलादेश क्रिकेट बोर्डने  (BCB) त्यादृष्टीने पावले उचलण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीबीने संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये एका धमाकेदार फलंदाजी प्रशिक्षकाची नियुक्त करण्याचा विचार करत आहे.

बीसीबीचे क्रिकेट संचालक जलाल युनूस यांनी सांगितले आहे की, “मॉर्कल एक किंवा दोन आठवडे संघासोबत असेल. तो फलंदाजांची मदत करेल. आम्ही या गोष्टींवर लक्ष ठेऊ आणि नंतर काय होते ते पाहूयात.” दरम्यान, मॉर्कलचे वय सध्या ४० वर्ष आहे. साल २००४ ते २०१५ दरम्यान दक्षिण अफ्रिका संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. यादरम्यान त्याने एक कसोटी, ५८ एकदिवसीय आणि ५० टी-२० सामने खेळले.

साल २०१९ मध्ये मॉर्कल नामिबिया संघाचा सहाय्यक प्रशिक्षक होता. दरम्यान, बांगलादेश संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये अलिकडच्या दिवसांमध्ये अनेक नियुक्त्या केल्या गेल्या आहेत. यामध्ये खालिद महमूल संघाचे डायरेक्टर, दक्षिण अफ्रिकेचे रसेल डोमिंगो मुख्य प्रशिक्षक, ऑस्ट्रेलियन जेमी सिडन्स कसोटी फलंदाजी प्रशिक्षक आणि एलन डोनाल्डला वेगवान गोलंदाजी प्रशिक्षकपद सोपवले गेले आहे. फिरकी गोलंदाजी प्रशिक्षकपदी श्रीलंकेचा रंगना हेराथ आणि क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदी ऑस्ट्रेलियाचे शेन मॅकडरमोट यांची नियुक्ती केली गेली आहे.

महत्वाच्या बातम्या –

Video: नॉन स्ट्राइकचा फलंदाज चेंडू टाकण्यापूर्वीच खेळपट्टीच्या मध्यात, मग गोलंदाजाचे कृत्य पाहून सर्वच चकीत

एसएनबीपी २८वी नेहरु अखिल भारतीय आंतरविद्यापीठ हॉकी स्पर्धा: संबलपूर विद्यापीठाकडून एमजी काशी विद्यापीठाचा पराभव

अखेर प्रतीक्षा संपलीच! तब्बल २५ महिन्यांनंतर बाबर आझमने कसोटी क्रिकेटमध्ये केली ‘ही’ खास कामगिरी

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.