भारत आणि दक्षिण अफ्रिकेत खेळल्या जात असलेल्या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील (sa vs ind test series) दुसरा कसोटी सामना जोहान्सबर्गच्या वांडरर्स स्टेडियमवर खेळला जात आहे. दोन्ही संघांसाठी हा सामना जिंकणे महत्वाचे आहे. दुसऱ्या सामन्यात दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये संघर्ष देखील पाहायला मिळाला. भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज मयंक अगरवाल (mayank aggarwal) याने तर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार डीन एल्गार (dean elgar) याला सरळ-सरळ स्वार्थी म्हटले आहे.
उभय संघातील दुसऱ्या सामन्यातील तिसऱ्या दिवशी मयंक अगरवाल डीन एल्गारसोबत स्लेजिंग करताना दिसला. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा प्रसंग दक्षिण अफ्रिकेच्या दुसऱ्या डावात घडला, जेव्हा कीगन पीटरसनची विकेट गेली. पीटरसन बाद झाल्यानंतर तो कर्णधार एल्गारसोबत रिव्यू घेण्याविषयी चर्चा करत होता. एल्गारने मात्र रिव्यू घेण्यास नकार दिला आणि हाच मुद्दा धरून मयंकने त्याला स्लेज केले. यावेळी स्टंपमाइकमध्ये मयंकचा आवाज कैद झाला.
मयंक डीन एल्गारला उद्देशून म्हणाला की, “जबरदस्त कर्णधार आहे, जबरदस्त कर्णधार आहे हा. फक्त स्वतःचा विचार करतो.”
— Bleh (@rishabh2209420) January 5, 2022
दरम्यान, सामन्यात मयंक आणि एल्गारव्यतिरिक्त इतरही खेळाडूंमध्येही संघर्ष पाहायला मिळाला. भारताचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत दुसऱ्या डावात जेव्हा फलंदाजीसाठी आला, तेव्हा दक्षिण अफ्रिकेचा वॅन डर डुसेनने त्याच्यासोबत स्लेजिंग केली होती. त्यानंतर पंत रागाच्या भरात शून्य धावांवर बाद झाला. तसेच भारताचा जसप्रीत बुमराह फलंदाजी करत होता, तेव्हा अफ्रिकी गोलंदाज जानसेनही त्याच्यासोबत अशाच प्रकारे स्लेजिंगचा प्रयत्न केला होता.
दरम्यान, सामन्याच्या सुरुवातील भारताचा संघने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताने पहिल्या डावात २०२ आणि दुसऱ्या डावात २६६ धावा केल्या. तर दुसरीकडे दक्षिण अफ्रिकेने पहिल्या डावात २२९ आणि धावा केल्या. शेवटच्या डावात दक्षिण अफ्रिकेला विजयासाठी २४० धावांचे लक्ष्य मिळाले. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत अफ्रिकेने दोन विकेट्सच्या नुकसानावर ११८ धावा केल्या आहेत. विजयासाठी त्यांना अजून १२२ धावांची आवश्यकता आहे.
महत्वाच्या बातम्या –
प्रो कबड्डी २०२१: तेलुगू टायटन्सपुढे दिल्लीच ठरली ‘दबंग’! अटीतटीच्या लढतीत १ अंकाने मारली बाजी
प्रो कबड्डी २०२१: पुणेरी पलटनचा विजयाचा ‘डबल’ धमाका, गुजरात जायंट्सवर ७ अंकांनी केली मात
व्हिडिओ पाहा –