दक्षिण अफ्रिकेविरुद्द आगामी एकदिवसीय मालिकेसाठी (sa vs ind odi series) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. या संघात अनेक युवा खेळाडूंना निवडले गेले आहे. अष्टपैलू वेंकटेश अय्यर (venkatesh iyer) यालाही संघात सामील केले गेले आहे. अय्यरने यापूर्वी आयपीएल आणि विजय हजारे ट्रॉफीत अप्रतिम प्रदर्शन केले होते आणि याच जोरावर भारताच्या एकदिवसीय संघात जागा बनवली होती. त्याने न्यूझीलंडविरुद्धच्या मायदेशातील टी२० मालिकेतून आंतरराष्ट्रीय पदार्पण केले होते. आता आगामी मालिकेत अय्यर कितव्या क्रमांकावर खेळणार याबाबत चाहत्यांना प्रश्न पडला आहे. अय्यरने स्वतः या प्रश्नाचे उत्तर दिले आहे.
आयपीएलमध्ये अय्यर कोलकाता नाइट रायडर्सचा भाग आहे आणि सलामीवीराची भूमीका पार पाडतो. परंतु, न्यूझीलंडविरुद्ध टी२० मालिकेत त्याने ५-६ क्रमांकावर फलंदाजी केली होती. अशात आगामी मालिकेत तो कितव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी येणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे. अय्यरला जेव्हा याविषयी प्रश्न विचारला गेला, तेव्हा यावर तो म्हणाला की, तो कोणत्याही क्रमांकावर फलंदाजीसाठी तयार आहे.
माध्यामांशी बोलताना अय्यर म्हणाला की, “एका व्यावसायिक क्रिकेटरच्या रूपात तुम्हाला नेहमी तयार राहावे लागले. तुम्ही कोणत्याही परिस्थितीत फलंदाजीसाठी तयार राहणे गरजेचे आहे. तुम्ही कोणत्याही संघासाठी खेळत असाल. त्यामुळे मी माझ्या मनाला तसेच प्रशिक्षण दिले आहे, जिथे जिथे मला फलंदाजी करायला मिळते, मला तिथे चांगले प्रदर्शन करायचे आहे. शक्य असलेल्या प्रत्येक ठिकाणी योगदान द्यायचे आहे. संघ व्यवस्थापनाकडून मिळणाऱ्या कोणत्याही भूमिकेसाठी तयार आहे. मी त्यावरच लक्ष केद्रित करत आहे.”
दरम्यान, अय्यरला यापूर्वी भारतीय संघाच्या खालच्या फळीत खेळला आहे. हार्दिक पंड्या सततच्या खराब प्रदर्शनानंतर संघातून बाहेर झाला आहे. हार्दिकच्या पर्यायी खेळाडूच्या रूपात अय्यरला संघात सामील केले गेले आहे. अशात अय्यरला खालच्या फळीत संधी मिळणे अपेक्षित होते. त्याचसोबत अय्यर गोलंदाजीमध्येही पंड्याची कमतरता भरून काढेल, अशी अपेक्षा आहे.
महत्वाच्या बातम्या –
युवा राकेशच्या मेहनतीवर पहलने फेरले पाणी; हरियाणाचा गुजरातवर रोमांचक विजय
जपून रे बाबा! झेल टिपण्याच्या नादात प्रेक्षकाने वृद्धाच्या अंगावर मारली उडी; पाहा थरारक व्हिडिओ
प्रसिद्ध फुटबॉलपटू ‘लिओनेल मेस्सी’ कोरोनाच्या विळख्यात, जगभरातील चाहते चिंतेत
व्हिडिओ पाहा –