दक्षिण आफ्रिका व श्रीलंका संघांमधील 2 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना जोहान्सबर्ग येथे खेळला जात आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने अपेक्षेप्रमाणेच उत्तम कामगिरी करत श्रीलंकेचा पराभव केला आहे. दुसऱ्या सामन्यातही आफ्रिकेने आपली मजबूत पकड बनवली आहे. मात्र या सामन्यातील क्रिकेटपेक्षा जास्त चर्चा झाली ती एका वेगळ्याच प्रसंगाची. सामन्यादरम्यान दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रासी वेन डर डूसनची तुलाना मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सोबत करण्यात आली. भारतात क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिनची झालेली अशी तुलना अनेक क्रिकेट चाहत्यांना आवडली नसून त्यांनी ट्विटरवर मजेशीर रित्या आपली नाराजी व्यक्त केली आहे.
दक्षिण आफ्रिकेचा खेळाडू रासी वेन डर डूसन फलंदाजी करत असताना सुपर स्पोर्ट्स या चॅनेलवर त्याची तुलना सचिन सोबत करण्यात आली. दोघांच्याही पहिल्या 6 सामन्यातील आकडे पुढे मांडण्यात आले . रासी वेन डर डूसनने पहिल्या 6 सामन्यात 32 च्या सरासरीने 292 धावा केलेल्या आहेत तर सचिनने पहिल्या 6 सामन्यात 36 च्या सरासरीने 327 धावा केल्या होत्या. 31 वर्षीय रासी वेन डर डूसनची सचिन सोबत झालेली ही तुलना अनेकांना आवडली नाही व त्यांनी सुपर स्पोर्ट्स ला देखील ट्रोल केले आहे.
Binny
Wickets – 20
Bowling Avg – 21.95
Best – 6/4
VS
Akram
Wickets – 16
Bowling Avg – 23.52
Best – 5/15 https://t.co/tZXs1YyM7B— cric.tweet (@Cutelittle07) January 3, 2021
They casually decided to compare Rassie to one of the FIVE greatest batsmen ever known. Did they also take into account that Sachin Tendulkar debuted against a great Pakistani team? Aged 17, he had already played more than 6 Test matches. https://t.co/drOzLfJWFW
— Dumisani Ndumo (@DumzaNdumo) January 3, 2021
दरम्यान सामन्याचा विचार केला असता, प्रथम फलंदाजी करणाऱ्या श्रीलंकन संघाचा पहिला डाव मात्र 157 धावांवर आटोपला. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकन संघ मोठी आघाडी घेणार असे वाटत असतानाच त्यांचे शेवटचे 8 फलंदाज केवळ 84 धावांवर बाद झाल्याने दक्षिण आफ्रिकेचा पूर्ण डाव 302 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेकडून डीन एल्गरने 127 तर रासी वेन डर डूसनने 67 धावांची खेळी केली.
श्रीलंकेने आपल्या दुसऱ्या डावात उत्तम लढाई केली असून दुसऱ्या दिवसाच्या समाप्ती पर्यंत 4 गडी गमावत 150 धावांपर्यंत मजल मारली होती. कर्णधार दिमुथ करुणारत्ने 91 तर निरोशन डीकवेला 18 धावांवर नाबाद आहेत. सामन्याचा तिसरा दिवस अतिशय महत्त्वाचा असून ,हे बघणे उत्सुकतेचे ठरेल की श्रीलंका संघ आपल्या दुसऱ्या डावात किती धावांची आघाडी घेतो.
महत्वाच्या बातम्या:
ब्रेकिंग! केएल राहुल दुखापतीमुळे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेतून बाहेर
बापरे बाप!! भारतीय खेळाडू राहत असलेल्या हॉटेलमधील तब्बल २० जण आढळले कोरोना पॉझिटिव्ह
केन विलियम्सनची झुंजार दीडशतकी खेळी, या मोठ्या विक्रमाला घातली गवसणी






