भारताने झिम्बाब्वेविरुद्धचा दुसरा वनडे सामना जिंकला असला, तरी कर्णधार केएल राहुल अन् बीसीसीआय टीकेचा धनी होत आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे झिम्बाब्वे दौऱ्यात पुनरागमन करत असलेला आणि पहिल्या सामन्यात ३ बळी घेणाऱ्या दीपक चाहरला संघातून वगळण्यात आले. यावर आता माजी क्रिकेटपटू सबा करीम यांनी आपले नमत व्यक्त केले आहे.
माजी क्रिकेटपटू सबा करीमने सांगितले की, दीपक चहरला संघातून वगळण्याचा निर्णय समजण्यापलीकडचा आहे. तो म्हणाला की, वेगवान गोलंदाजांवर कामाचा ताण कमी करण्यासाठी खबरदारीचे उपाय करणे योग्य आहे, परंतु हा निर्णय समजणे खरोखर कठीण आहे. दीपक चहरवर भार जास्त नव्हता, त्यामुळे विश्रांती देण्याचा निर्णय योग्य नाही. वेगवान गोलंदाजासाठी दुखापतीतून पुनरागमन करणे सोपे नसते, त्यामुळे दीपक चहरला जास्तीत जास्त सामने खेळण्याची संधी मिळावी.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘आम्हाला फरक पडत नाही!’ दक्षिण आफ्रिकेकडून मिळालेल्या लाजीरवाण्या पराभवानंतर स्टोक्सने फुंकले रणशिंग