---Advertisement---

‘सुर्यकुमार यादवने याच क्रमांकावर फलंदाजी करावी’, माजी दिग्गजाने दिला मोलाचा सल्ला

On: बुधवार, ऑगस्ट 3, 2022 4:08 PM
Suryakumar-Yadav
---Advertisement---

वेस्ट इंडिजविरुद्ध सुरू असलेल्या पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या तीन टी-२० सामन्यांमध्ये सूर्यकुमार यादवने कर्णधार रोहित शर्मासह डावाची सुरुवात केली आहे. पहिल्या दोन सामन्यात सूर्या अपयशी ठरला पण तिसऱ्या सामन्यात त्याने सामना जिंकणारी खेळी खेळली आणि त्याला सामनावीर म्हणूनही गौरविण्यात आले, पण असे असूनही त्याच्या फलंदाजीच्या क्रमाची चर्चा संपत नाही.

माजी क्रिकेटपटू सबा करीमचे मत आहे की, सुर्यकुमारसाठी सर्वोत्तम फलंदाजी क्रमांक-४ आहे. त्याने त्याच क्रमांकावर फलंदाजी तकरणे आवश्यक आहे. सबा करीम म्हणाला की, “मला अजूनही वाटते की त्याच्यासाठी सर्वोत्तम फलंदाजीची स्थिती क्रमांक-४ आहे. विशेषतः जगातील सर्वोत्तम गोलंदाजी आक्रमणाविरुद्ध. आयसीसी इव्हेंटमध्ये चोथ्या क्रमांकावर फलंदाजीची स्थिती खूप महत्त्वाची ठरते, अशा स्थितीत तुम्हाला सूर्यकुमार यादवसारख्या खेळाडूची गरज आहे. तो वेगवान गोलंदाजांबरोबरच फिरकीपटूंनाही खेळतो आणि स्ट्राईक रेटही संतुलित करतो.”

दुसरीकडे माजी क्रिकेटपटू रितेंदर सिंग सोधी म्हणाला की, “तो एक अद्भुत खेळाडू आहे, त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वत:ला सिद्ध केले आहे. तो मधल्या फळीतील उत्कृष्ट खेळाडू आहे, त्याला खेळ कसा चालवायचा हे माहीत आहे. त्याला स्ट्राइक कसे बदलायचे हे माहित आहे आणि स्कोअरबोर्ड थांबू देत नाही. सूर्यकुमार यादवच्या सलामीबाबत कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे की, सर्व फलंदाजांनी प्रत्येक बॅटिंग पोझिशनवर बॅटिंग करताना आरामदायक असावे असे मला वाटते.”

दरम्यान, सुर्यकुमार यादवने वेस्ट इंडिज विरुद्धच्या तिसऱ्या टी-२० मालिकेत सलामीवीराची भुमिका बजावत अर्धशतक झळकावले. त्यानंतर अनेकांनी त्याच्यावर कौतुकांचा वर्षाव केला आहे. मात्र, सुर्यकुमारच्या अर्धशतकी खेळीमुळे भारतीय संघाला आक्रमक सलामीवीर फलंदाज म्हणून आणखी एक पर्याय उपलब्ध झाला आहे. शिवाय याआधी सलामीवीराची भुमिका सांभाळणारा केएल राहुल गेल्या अनेक काळाापासून दुखापतग्रस्त असल्याचे चित्र समोर आहे. अशा परिस्थितीत कएल राहुल थेट आशियाचषकात पुनरागमन करेल अशी शक्यता फार कमी आहे. त्यामुळे केएल राहुलला पर्याय म्हणून भारतीय संघ एक ठोस सलामीवीर फलंदाज शोधत आहे. अशात अनेकांकडून आता सुर्यकुमार यादवला संघात सलामीवीराची भुमिका प्रदान करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

CWG 2022 | पाचव्या दिवशी भारताच्या पारड्यात ४ पदकांची भर, वाचा खेळाडूंची कामगिरी

टीम इंडियाबरोबर एशिया कपमध्ये दोन हात करण्यासाठी पाक संघाची घोषणा, पाहा संपुर्ण संघ

‘तू भारताचा हार्दिक पंड्या झाला आहेस का?’ पत्रकाराच्या प्रश्नावर भारतीय अष्टपैलूचे दिलखुलास उत्तर

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---