सध्या, टेनिस ग्रँड स्लॅम स्पर्धा फ्रेंच ओपन 2023 ची क्रीडाप्रेमींमध्ये मोठ्या प्रमणात क्रेझ दिसून येते. दरम्यान, या मोसमामध्ये पुन्हा एकदा महिला टेनिस संघटनेची जागतिक क्रमवारीत अव्वल स्थानी असणारी महिला स्टार इगा स्वियाटेकने या हंगामात दणदणीत विजय मिळवला आहे. पोलंडच्या इगाने महिला एकेरीच्या तीसऱ्या फेरीमध्ये विजय मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले.
सामन्यावेळी तिच्या लढतीत इगाने चीनच्या वांग जिन्यु (Wang Xinyu) हिचा 6-0, 6-0 असा सरळ पराभव केला. इगासाठी हा सामना अवघड नव्हता. दोघींमधील हा खेळ 51 मिनिटांमध्येच संपला. इगाच्या (Iga Swiatek) विजयामुळे जागतिक क्रमवारीत 80 व्या स्थानावर असलेल्या वांगचा पराभव झाला आहे. (Tournament French Open 2023)
रशियाच्या अॅंड्रीवाचा केला पराभव
दुसरा सामना अमेरिकन स्टार कोको गॉफ (Coco Goff) विरुद्ध रशियाची मीर अॅंड्रीवा (Mir Andreeva) यांच्यात खेळला गेला. या महिला एकेरीच्या सामन्यात 19 वर्षीय कोको गॉफने वियज मिळवत उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. गॉफने अॅंड्रीवाचा 6-7, 6-1, 6-1 असा पराभव केला. कोको गॉफ सध्या जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानी आहे. तर, अॅंड्रीवा 143 व्या क्रमांकावरती आहे. आता उपउपांत्यपूर्व फेरीमध्ये कोको गोफची लढत स्लोव्हाकियाची स्टार खेळडू अॅना कॅरोलिना श्वीडलोव्हाशी होईल.
साबालेन्कानेही गाठली उपांत्यपूर्व फेरी
जागतीक क्रमवारीमध्ये दुसऱ्या (Women’s Tennis Association) क्रमांकावर असलेल्या आर्यना सबालेंकानेही (Aryna Sabalenka) सामना जिंकला असून सुपर-16 गटामध्ये आपले स्थान निश्चित केले. तसेच, तिसऱ्या फेरीतील महिला एकेरीच्या लढतीत बेलारुसच्या अरिनाने रशियाच्या कामिला राखिमोवाचा 6-2, 6-2 अश्या सरळ सेटमध्ये तिचा पराभव केला.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
कोण म्हणतंय ‘सुपरस्टार’, तर कुणी विराटच्या कव्हर ड्राईव्हच्या प्रेमात! कांगारुंकडून ‘किंग’ कोहलीचं कौतुक
भारतासाठी 7 वर्षांपासून खेळतोय, 212 विकेट्सही नावावर, पण कधीच खेळला नाही कसोटी सामना; तो खेळाडू कोण?