सचिनने २४ वर्ष आपल्या बॅटची जादू भारतातल्याच नाही तर जगभरातल्या क्रिकेट रसिकांना दाखवली आहे. सचिन हा जगभरात क्रिकेटच आराध्य दैवत म्हणून ओळ्खला जातो . २००७ मध्ये नवीन प्रकार म्हणजेच टी २० विश्वचषकाची तयारी चालू झाली आणि या चषकात सचिन खेळणार नसल्याचे त्याने घोषित केले त्याबरोबरच आणखीन काही वरिष्ठ खेळाडूंनीही हाच निर्णय घेतला . दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या या विश्वचषकाला धोनी आणि नवीन भारतीय संघ गेला व विश्वचषक जिंकून आणला . या नंतरच बीसीसीआयने नवीन संकल्पनेला जन्म दिला ती म्हणजे “आयपीएल”.
जगभरातील सचिनच्या चाहत्याना उत्सुकता होती की या नवीन क्रिकेटच्या प्रकारात क्रिकेटच आराध्य दैवत कसा खेळ करणार. सचिनकडे मुंबई संघाच्या नेतृत्वाचीही जबाबदारी देण्यात आली होती . सचिनने चौथ्याच सामन्यात आपल्या बॅटची चमक दाखवली त्याने वानखेडेवर ६५ धावांची खेळी या नवीन प्रकारात आपले पहिले अर्धशतक नोंदवले .
पाहुयात सचिनने केलेले आयपीएलमधील काही विक्रम
१. पाचवा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज (२३३४) .
२. १४ अर्धशतके व १ शतक .
३. २०१० चा ओरेंज कॅप व विजेता .
४. पहिला भारतीय फलंदाज ज्याने ओरेंज कॅप मिळाली.
५. एका सामन्यात सर्वाधिक म्हणजेच ४ झेल घेणारा खेळाडू.
६. ५८ % विजयी सरासरी असलेला कर्णधार .
सचिनने सहाव्या प्रयत्नात २०११ मध्ये विश्वचषक जिंकला आणि सहाव्याच प्रयत्नांत आयपीएलही जिंकली . आयपीएल जिंकल्यानंतर सचिनने लगेचच त्याने आयपीएल मधून निवृत्ती घेतली. त्यानंतर मुंबईच्याच रोहित शर्माने मुंबईच्या संघाला चांगली दिशा दाखवली आहे.
लेखक- आकाश खराडे
( टीम महा स्पोर्ट्स )
(टीप: लेखातील मते ही लेखकाची वैयक्तिक मते आहे. महा स्पोर्ट्स सर्व मुद्द्यांशी सहमतच असेल असे नाही)