भारताचे माजी कर्णधार अजित वाडेकरांचे बुधवारी रात्री दिर्घ आजाराने 77 व्या वर्षी निधन झाले. त्यांनी भारतीय क्रिकेटमध्ये वेगवेगळी पदे सांभाळली आहेत.
ते भारताचे पहिले वनडे कर्णधारही होते. तसेच त्यांच्या नेतृत्वाखाली भारताने 1971 मध्ये परदेशात पहिल्यांदा सलग दोन कसोटी मालिकाही जिंकल्या.
निवृत्तीनंतर त्यांनी भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षकपदही सांभाळले. त्यांनी 1992 ला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावेळी मोहम्मद अझरुद्दीन कर्णधार असलेल्या भारतीय संघाचे प्रशिक्षकपद हाती घेतले. त्यांचे आणि अझरुद्दीनचे चांगले गणित जमल्याने भारताने त्यावेळी अनेक विजय मिळवले.
पुढे 1994 मध्ये न्यूझीलंड दौऱ्यात वनडे सामन्यावेळी त्यांनी मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरला पहिल्यांदा सलामीला पाठवण्याचा निर्णय घेतला.
त्यामुळे सचिन सलामीवीर बनण्यात वाडेकरांनी महत्त्वाची भूमिका निभावली होती. त्यानंतर मात्र सचिनने अनेक विक्रम रचत कारकिर्दीत कधीही मागे वळून पाहिले नाही.
वाडेकरांच्या निधनानंतर सचिननेही भावूक ट्विट करत त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. सचिनने ट्विटमध्ये म्हटले आहे की, “अजित वाडेवकरांचे निधन झाल्याचे ऐकूण वाईट वाटले. 90 च्या दशकात आमच्यातील सर्वोत्तम कामगिरी बाहेर येण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. आम्ही त्यांच्या मार्गदर्शनासाठी नेहमीच कृतज्ञ राहू. ”
Deeply saddened to hear about the demise of Ajit Wadekar Sir. He was someone who was instrumental in bringing out the best in us during the 90s. We’ll always be grateful for his advice and guidance. Praying for strength for his family during this difficult time. 🙏 RIP pic.twitter.com/coSyac73ot
— Sachin Tendulkar (@sachin_rt) August 16, 2018
सचिन बरोबरच अनेक आजी-माजी खेळाडूंनी वाडेकरांच्या निधनानंतर ट्विट करुन त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
#AjitWadekar sir .. such an iconic person..deeply saddened by his demise!! Sir was a father figure for me.. May his soul rest in peace! My Heartfelt Condolences to the family..@BCCI pic.twitter.com/xLMb2i82B2
— Mohammed Azharuddin (@azharflicks) August 15, 2018
Deeply saddened by the passing away of #AjitWadekar He was more than a coach to the entire team – a father figure and a shrewd tactician. My heartfelt condolences to his family and loved ones. He will be missed. Thank you Sir for the confidence shown in my ability! 🙏
— Anil Kumble (@anilkumble1074) August 16, 2018
Sad moment for Indian cricket to lose one of its most successful captains. Shrewd to the core. Condolences to the entire family #TeamIndia #RIPAjitWadekar pic.twitter.com/0xC0fv3Ark
— Ravi Shastri (@RaviShastriOfc) August 15, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–अजित वाडेकरांबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी
–वाढदिवस विशेष- कसोटी क्रिकेट गाजवलेल्या चंद्रपाॅलबद्दल माहित नसलेल्या ५ गोष्टी