समजा तुम्ही गाडी चालवत असाल, तुम्ही सिग्नलला थांबलात आणि तुमच्या शेजारील चारचाकीत तुम्हाला क्रिकेटचा देव सचिन दिसला तर तुम्ही काय कराल ?
असेच काही हैद्राबादमधील तरुणांनी अनुभवले . तरुणाचे दुचाकी वाहन जेव्हा सिग्नलवर थांबले तेव्हा शेजारील गाडीमध्ये त्याना स्वतः क्रिकेटचा देव म्हणजेच सचिन दिसला मागे बसलेला दिसला. पाठीमागे बसलेला तरुण लगेचच उठून सचिन बरोबर सेल्फी काढायला लागला सचिनने त्याला फोटोकाढून दिले आणि त्यानंतर गाडी चालवणाऱ्या तरुणाला सांगितले की हेल्मेट घाल . या घटनेचा विडिओ सचिनने आपल्या ट्विटर आणि फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे.
सचिन हेंद्राबादला आयपीलच्या उदघाटन सोहळ्यासाठी आला होता .सचिन हा मुंबई इंडियन्स संघाचा मेंटॉर आहे आणि तो ठिकठिकाणी त्याच्या संघाला प्रोसाहन देण्यासाठी जात आहे. सचिनने मागच्याच आठवड्यात “१००एमबी” सा अँप काढला आहे ज्यात तोच जे काही करणार आहे ते सर्व आपल्या चाहत्यानं बरोबर शेअर करणार आहे.