आता हे सर्व सचिनप्रेमींना आणि क्रिकेट चाहत्यांना माहित आहे की सचिनला एक मोठा क्रिकेटपटू घडविण्यात त्याचा भाऊ अजित तेंडुलकरचा किती मोठा हात आहे. सचिन जर क्रिकेटमध्ये कुणामुळे आला असेल तर तो अजितमुळे.
एवढा मोठ्या खेळाडूच्या कारकिर्दीत एवढं मोठं योगदान देऊनही अजित कधी कॅमेऱ्यासमोर जास्त आलाच नाही. अगदी अलीकडे म्हणजे सचिनच्या क्रिकेटमधील निवृत्तीनंतर त्याने थोडंफार माध्यमांसमोर यायला सुरुवात केली.
There is no buddy like a brother!! Thank you for all your support over the years, Ajit. Watch the full video on 100MB. #SachinABillionDreams pic.twitter.com/fbjOOLkY2f
— Sachin Tendulkar (@sachin_rt) May 20, 2017
परंतु सचिन आपल्या या भावाबद्दल सदैव काहींना काही बोलत असतो. आपल्या कारकिर्दीच श्रेय त्याला असतो. असच आपल्या भावाचं महत्त्व सांगणारा एक व्हिडिओ सचिनने ट्विटर आणि १०० एमबी ह्या त्याच्या अँप्लिकेशनवर शेअर केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडिओ मराठीमध्ये असून तो सचिनचा पुढील आठवड्यात प्रदर्शित होणाऱ्या सचिन अ बिलियन ड्रीम मधील आहे. ज्यात सचिन म्हणतो, ” जेव्हा मी मोरली डाउन असायचो, तेव्हा एकाच अशी व्यक्ती होती जिचा मला आधार वाटायचा. ती म्हणजे माझा भाऊ अजित.